Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" उड्डाण करिअर अकॅडमी " - नेरळ ची गगनभेदी झेप !

” उड्डाण करिअर अकॅडमी ” – नेरळ ची गगनभेदी झेप !

अविनाश राठोड व सुनील मोहिते अवघ्या ३ महिन्यांत भारतीय सैन्य दलात भरती…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात योग्य मार्गदर्शन घडल्यास राखेतून देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात गरुड भरारी घेण्याचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकते , हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही .अर्जुना सारखी मनात ध्येय गाठण्याची जिद्द असेल व योग्य मार्गदर्शनाची साथ असेल तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकता , द्रोणाचार्या सारखे नेमके हेच मार्गदर्शन ” उड्डाण करिअर अकॅडमीचे ” सर्वेसर्वा अंकुश माळी सर आज कर्जत तालुक्यातील नेरळ येथे विद्यार्थ्यांना करत आहेत , म्हणूनच अवघ्या ३ महिन्यांत अविनाश राठोड – कर्जत व सुनील मोहिते – कळंब यांना योग्य ट्रेनिंग देऊन भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने उड्डाण करिअर अकॅडमीच्या या यशाने दाखवून देऊन इतिहास घडविला आहे.
या सर्वाधिक निकालाने ” उड्डाण करिअर अकॅडमीचे ” योग्य मार्गदर्शन मिळाल्यानेच कर्जत तालुक्यातील अविनाश राठोड – कर्जत व सुनील मोहिते – कळंब या तरुणांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अथक परिश्रम करून भारतीय सैन्य दलात यशस्वी होऊन आपले व आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले . या त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होऊन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांची अग्निविर मैदानी हि परीक्षा सप्टेंबर २०२२ रोजी ए.पी.जे.अब्दुल कलाम स्टेडियम – मुंब्रा ( जि.ठाणे ) येथे पार पडली. या मैदानी चाचणी धावण्याच्या परिक्षेत १६०० मीटर अंतर त्यांनी पार करत उत्तीर्ण झाले.तर मेडिकल व अग्णिविर मध्ये शारीरिक चाचणी पास झालेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा (written test ) १३ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आली , यांत हि ते उत्तीर्ण झाले.अविनाश राठोड व सुनील मोहिते यांचे भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न साकार करण्यास ” उड्डाण करिअर अकॅडमीचे ” संचालक व सर्वेसर्वा श्री. अंकुश माळी सर , मैदानी शिक्षक अविनाश मिसाळ , महेंद्र भालचीम यांचे वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आज भारतीय सैन्य दलात (indan army ) मध्ये आमची निवड झाली , असे त्यांनी सांगितले. ” उड्डाण करिअर अकॅडमी ” कर्जत तालुक्यातील निर्माण आकाश बिल्डिंग, पहिला मजला, रूम नंबर 103 , निर्माण नगरी – नेरळ पूर्व येथे ५ जून २०२२ रोजी सुरू केली असून अल्पावधीतच नावारूपास आली आहे.
सध्या या अकॅडमीत ६० विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून आपण ही आपल्या पाल्यांना भारतीय सैन्य दलात भरती करण्याचे असल्यास 9067143660 ” उड्डाण करिअर अकॅडमीचे ” सर्वेसर्वा अंकुश माळी सर यांना या नंबरवर संपर्क करून सराव परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य झाल्यास आपल्या पाल्यांचे स्वप्न साकार करू शकता .अविनाश राठोड – कर्जत व सुनील मोहिते – कळंब यांची भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच कुटुंबातील सदस्य , मित्र परिवार यांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page