Thursday, March 28, 2024
Homeपुणेमावळएकविरा देवी गडावर समस्यांचा विळखा, प्रशासनाचा ताळमेळ नसल्याने भाविकांची दुरावस्था..

एकविरा देवी गडावर समस्यांचा विळखा, प्रशासनाचा ताळमेळ नसल्याने भाविकांची दुरावस्था..

लोणावळा – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, अराध्यदैवत असलेल्या कार्ला एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुख सुविधा देण्यास प्रशासन हतबल.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला एकविरा देवी गडावर असुविधेचे साम्राज्य, लाखो भाविकांच्या गडावर 16 कोटींचे शौचालय शासनाने बांधले असून त्या शौचालयास पाणी पुरविण्यासाठी एक 3 हजारांचा पाणी पंप यांना बसविता आला नाही यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी नाराजी व्यक्त केली असून जोपर्यंत गडावरील भाविकांना सुख सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत पुरातत्व विभागाचे तिकीट काउंटर बंद ठेवण्यात येईल असे आवाहन मनसे च्या वतीने करण्यात आले आहे.

एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने भाविक व पर्यटकांचे अतोनात हाल होत आहेत.मंदिर परिसर सध्या समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून पिण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ भविकांवर आली आहे.

गडावर चढताना जागोजागी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत, ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना पायऱ्या चढताना शौचालयाची सुविधा यासारख्या सोय सुविधा उपलब्ध करून देईपर्यंत पुरातत्व विभागाचे तिकीट काउंटर बंद ठेवण्यात येणार असून लवकरच याची दक्षता न घेतल्यास मनसे कडून ठोस पाऊल उचलले जाईल असा इशारा मनसे च्या वतीने देण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page