Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया धनगर महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या संगीता बावदाणे यांचा सत्कार..

ऑल इंडिया धनगर महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या संगीता बावदाणे यांचा सत्कार..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघ रायगड यांच्या वतीने आपटा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचीत सदस्या संगीता लक्ष्मण बावदाणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


पनवेल तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत आपटा या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये शिवसेना शेकाप महाविकास आघाडी कडून वार्ड क्रमांक एक मधून संगीता लक्ष्मण बावदाने ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या त्यामुळे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड यांच्या वतीने शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.


सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र शिंदे यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड जिल्ह्याच्या वतीने रामचंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्या संगीता बावदाने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव कचरे, रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र पुकळे, जावळी तालुका उधोजक आणि सामाजिक कार्यकर्ते ,धनगर समाज कार्यात नेहमी आणि महासंघात नेहमी अग्रेसर असणारे रामचंद्र शिंदे, पनवेल तालुका महिला अध्यक्षा अर्चना शिंदे, खालापूर तालुका अध्यक्ष ठकुराम झोरे युवा नेते नारायण हिरवे शिवसेना सारसई शाखा प्रमुख लक्ष्मण बावदाने आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page