Thursday, March 28, 2024
Homeपुणेदेहूरोडकपाटातील कपडे काढताना बंदूकीतून गोळी सुटली आणि आई जखमी झाली , मुलावर...

कपाटातील कपडे काढताना बंदूकीतून गोळी सुटली आणि आई जखमी झाली , मुलावर गुन्हा दाखल !

देहूरोड :कपाटात ठेवलेले कपडे काढताना परवानाधारक पिस्तुलातून गोळी सुटली , अन् आई गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि .24 रोजी रात्री अकरा वाजता मिडास रेसिडेन्सी कचरा डेपोसमोर देहूगाव येथे घडली.

लता मराठे असे जखमी महिलेचे नाव असून पोलीस हवालदार किशोर दुतोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार लता यांचा मुलगा अक्षय शांताराम मराठे ( वय 26 , रा . मिडास रेसिडेन्सी , कचरा डेपोसमोर , देहूगाव ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अक्षय मराठे याच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे . ती त्यांनी त्यांच्या कपड्यांच्या कपाटात ठेवली होती . त्यांना मंगळवारी रात्री बाहेरगावी जायचे असल्याने ते टी शर्ट घालण्यासाठी शोधत होते . मात्र टी शर्ट मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या आईला आवाज दिला आणि टी शर्ट शोधण्यास सांगितले.

अक्षय हा कपाटातून त्याचा ड्रेस ओढून बाहेर काढत असताना कपड्यांवर ठेवलेले पिस्तुल खाली पडले आणि त्यातून एक गोळी झाडली गेली . ती गोळी कपाटाच्या दरवाजातून आरपार जाऊन आई लता यांच्या पायाला लागली . यात लता या जखमी झाल्या आहेत . याप्रकरणी अक्षय याने इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page