![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेर गेली ४० वर्षे घाटी मसाला व मिरचीचा व्यापार करणारे प्रसिद्ध मसाले वाले अशोक राठोड ( वय – ५० ) यांचे शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ – ३० वाजता ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले . गेली आठ दिवस त्यांना डायबेटिसचां त्रास जाणवत असल्याने व बी. पी. वाढल्याने त्यांना पनवेल येथे उपचार सुरू होते . मात्र त्यांचे शरीराने साथ न दिल्याने अखेर हदयविकाराने त्यांचे निधन झाले . त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या परिसरात व मित्र परिवारात हळहळ पसरली आहे.त्यांचा अंत्यविधी रविवारी १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पार पडले.
गेली अनेक वर्षे रेल्वे बाहेरील कर्जतच्या नाक्यावर ते त्यांची दोन मुले अजय व ओम यांच्या मदतीने घाटी मसाला व मिरची चां धंदा करत होते .मुंबई , पुणे , ठाणे , नवी मुंबई , पनवेल , तर संपूर्ण कर्जत – खोपोली येथून त्यांच्याकडे मिरची मसाला घ्यायला महिला व नागरिक येत असत . एकदम दिलखुलास स्वभावाचे अशोक नेहमीच हसतमुख असायचे . त्यांना डायबेटिस चां त्रास होता , यावेळी त्यांची धावपळ खूप झाल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली होती.
पनवेल येथे त्यांचे उपचार सुरू होते , डायबेटिस वाढल्याने व शरीराने साथ न दिल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली .
त्यांच्या अंत्य यात्रेस म्हाडा कॉलनी , आमराई व कर्जत मधील व्यापारी , धंदेवाले , त्यांचा मित्र परिवार , राठोड परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुले , नातवंडे , सूना , भाऊ , बहिण असा मोठा परिवार आहे.