Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये क्रांतीनगर फातिमानगर येथे पावसाच्या पाण्याने येणाऱ्या समस्यांची मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी...

कर्जतमध्ये क्रांतीनगर फातिमानगर येथे पावसाच्या पाण्याने येणाऱ्या समस्यांची मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी केली पाहणी..

भिसेगाव नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांच्या मागणीला यश..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषद हद्दीत भिसेगाव प्रभागातील क्रांतीनगर – फातिमानगर परिसरात दरवर्षी पावसाळ्यात टेकडीवरून येणाऱ्या पाण्यामुळे गटारांअभावी परिसरात पाणी शिरून ते तुंबून रहाते .याबाबतीत भिसेगाव येथील नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी पालिकेत वारंवार तक्रारी केल्या आहेत ,म्हणूनच आताच्या या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांना बोलावून पाहणी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील ,नगर अभियंता मनीष गायकवाड ,सहाय्यक अभियंता माने ,आरोग्य अधिकारी सुदाम अण्णा म्हसे यांना पाहणी करण्यास बोलावले असता भिसेगाव नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी क्रांतीनगर फातिमानगर हा परिसर दाखविला.हा परिसर कर्जत रेल्वे स्थानक लगत आहे.फातिमानगर परिसरात टेकडीवरून आलेले पाणी उतरंड असल्याने थेट खाली येऊन तुंबून रहाते,तर क्रांतीनगर परिसरात नवीन झालेल्या रस्त्याच्या कामात एका बाजूलाच गटार असल्याने परिसराच्या बाजूला गटारांअभावी पाण्याचा प्रवाह परिसरात येऊन थांबते.

याबाबतीत येथील रहिवासी यांनी वारंवार तक्रारी पालिकेत नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी , मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व येथील नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांना केलेली आहे. म्हणूनच अशा या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी पर्याय काढण्याची मागणी नगरसेवक ठोंबरे यांनी केली आहे.याबाबतीत बिकानेर ते फातिमा माता चर्च शेजारी व येथील असलेल्या चाळीपर्यंत रस्ता व गटार बनवून.

टेकडीवरून येणाऱ्या संततधार पावसाच्या पाण्याला गटारात मार्ग दिल्यास ही समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येणार असल्याने बिकानेर ते भिसेगाव चार फाटा ह्या एमएमआरडीए च्या निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामांतील एस्टीमेंटमध्ये साधारणतः या कामाची तरतूद देखील केली असून या परिसरात गटारे व सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाल्यास टेकडीवरून येणारे पाणी गटारात जाईल.

अशी तरतूद करणार असल्याचे ठामपणे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी पाहणी केल्यावर नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांना सांगितले. वारंवार केलेल्या मागणीचा अखेर नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी पाठपुरावा करून क्रांतीनगर – फातिमानगर या परिसरातील रहिवासी यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या गंभीर समस्येला अखेर तडीस नेल्याने परिसरातून नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांना अनेकांनी धन्यवाद व्यक्त केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page