Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये पोलीस मित्र संघटनेचे कोकण अध्यक्ष रमेश कदम यांचे अनेक समस्या घेऊन...

कर्जतमध्ये पोलीस मित्र संघटनेचे कोकण अध्यक्ष रमेश कदम यांचे अनेक समस्या घेऊन ” आत्मत्याग आंदोलन ” !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील प्रशासकीय कारभार ” बेभरोसे ” चालला असून त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अनेक समस्या खितपत पडल्या आहेत . याविरोधात १५ वेळा प्राणांतिक आमरण उपोषण करूनही आश्वासनाला ” गाजराची पुंगी ” दाखवून आजपर्यंत प्रशासनाने समस्या न सोडविल्यामुळे तालुक्यातील अधिकारी वर्गास ” धोबी पछाड ” करण्यासाठी १६ वे प्राणांतिक उपोषण व विष पिऊन आत्मत्याग करण्यासाठी ” दंड थोपटून ” पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष रमेश शांताराम कदम हे सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ पासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात बसले आहेत.
आज त्यांच्या या उपोषणाचा दुसरा दिवस आहे . या उपोषणास भारतीय जनता पक्षाने , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांनी पाठींबा दिला आहे.सदरचे उपोषण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत , तहसीलदार अधिकारी कार्यालय कर्जत व सर्व मंडळ व तलाठी अधिकारी , महावितरण कंपनी कर्जत कार्यालय , वनअधिकारी कार्यालय कर्जत , लघु पाटबंधारे राजिप विभाग कार्यालय कर्जत , जलसंपदा पाटबंधारे उपविभाग अधिकारी कार्यालय कर्जत , या सर्व अधिकारी वर्गांच्या विरोधात हे प्राणांतिक उपोषण व विष पिऊन आत्मत्याग आंदोलन असून , विशेष म्हणजे या सर्व कार्यालयांच्या विरोधात कोकण अध्यक्ष रमेश कदम यांनी आमरण उपोषण केलेले असून उपोषण सोडताना दिलेले लेखी आश्वासन त्या – त्या कामचुकार अधिकारी वर्गाने पूर्ण केलेले नसल्याने त्या – त्या समस्या आजही जैसे थे आहेत.

प्रांत कार्यालयात उपोषणकर्ते आदिवासी शेतकरी नामदेव बाळू आगीवले फसवणुकीचे प्रकरण आहे , त्याचप्रमाणे काही दावे – प्रतिदावे निकाली काढण्यास विलंब लागतो , तर सेटिंग दावे ताबडतोब होतात , असा कदम यांचा आरोप आहे , तहसील कार्यालयात सात बारा , फेरफार , ८ अ कागदपत्रांचे शासन नियमानुसार १५ रू. घेतले जातात , मात्र याचा हिशोब ठेवला नसून यात घोटाळा झाल्याचे कदम यांचा आरोप आहे , वीज कंपनीने गंजलेले – वाकलेले – झुकलेले जुने पोल , जुन्या वायर अद्यापी बदलले नाहीत , ६ हजार पेक्षा जास्त फॉल्टी मीटर बदलले नाहीत , त्यामुळे चुकीचे वाढीव बिल येत असल्याने ग्राहकांत संताप आहे.
वनअधिकारी यांनी देखील आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे , तसेच उल्हास नदीत बेकायदेशीर , पूर येऊन नागरिकांना धोका जीविततहानी होईल , असे बांधकाम केले आहे , याची तक्रार करूनही जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष आहे , अद्यापी कारवाई नाही , असे विविध प्रश्नांची उकल होण्यासाठी व प्रशासकीय अधिकारी वर्गाला सरळ करण्यासाठी हे उपोषण असून हे ” आत्मत्याग आंदोलन ” ऐन गर्मीत अधिकारी वर्गास किती ” शेकतोय ” हे पुढे समजणार आहेच , मात्र हे प्राणांतिक उपोषण कर्जत तालुक्यातील प्रमुख अधिकारी वर्गाच्या विरोधात असल्याने याची दखल घेण्यास जिल्हाधिकारी कार्यालयातूनच मा . जिल्हाधिकारी यांस यावे लागेल , असेच काहीसे चित्र या आगळ्या – वेगळ्या उपोषणांने दिसत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page