Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा !

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा !

महाराष्ट्राबरोबरच देशात गाजावाजा असणाऱ्या राष्ट्रवादीचा सर्वत्र डंका…

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) “आवाजकुणाचा..आवाजजनतेचा..दाही दिशा बघा घुमला….राष्ट्रवादी पुन्हा….”२३ वर्षे एकच नेते , एकच विचार , पुरोगामी विचारधारा घेऊन महाराष्ट्रात राहून देशात गाजावाजा असलेल्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात कर्जतमध्ये राष्ट्रवादी भवन – दहिवली येथे साजरा करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा , नागरिकांच्या अडचणी , त्यांची कामे करून घराघरात पक्ष नेऊन आगामी निवडणुकीत पक्षाचा झेंडा सर्वदूर नेऊन विजयी करा , असा संदेश आजच्या दिनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मिळाला.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमाताई मुंढे तसेच जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.सुधाकर घारे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते शरदभाऊ लाड, तालुकाध्यक्षा रंजना धुळे , शहराध्यक्ष तथा नगरसेविका पुष्पाताई दगडे, जिल्हा सरचिटणीस पूजा सुर्वे, वर्षा पाटील, रेश्मा चौधरी, माजी नगराध्यक्षा रजनीताई गायकवाड, नगरसेविका सुवर्णा निलधे, वंदना थोरवे, संतोष पाटील, कैलास पोटे, संतोष थोरवे, बाळू ऐनकर, बाळू गायकवाड, अक्षय जाधव, निलेश घरत, केशव वांजळे, धीरज जाधव, सुदेश हजारे,जयंत पाटील, ऋषभ लाड, नंदू रुठे,महेश चंदन पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत तालुक्यातील स्थापने नंतर सन १९९९ , २००९ , २०१४ असे तीन वेळा माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी या कर्जत – खालापूर मतदार संघावर विकासाच्या जोरावर अधिराज्य केले . त्यांच्याच नेतृत्वाखाली येथे राजिपचे अध्यक्षपद सुरेश दादा टोकरे , राजिप उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे , तर खोपोली , कर्जत , माथेरान येथे पालिकेवर नगराध्यक्ष पद भूषविले आहे . या २३ वर्षांत कर्जत पंचायत समितीचे सभापती पद तर अनेक ग्रामपंचायती वर सरपंच पदे , भूषवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकत राहिला आहे . या २३ वर्षांत कर्जत – खालापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब , खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेशभाऊ लाड हे एकच नेता , या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांची निष्ठा आहे . यावेळी जेष्ठ नेते तानाजी चव्हाण यांनी पक्षाच्या १० जून १९९९ स्थापने पासूनच्या वाटचालीविषयी माहिती सांगून भविष्यात संघटना मजबूत करण्याविषयी मार्गदर्शन केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page