Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये सार्वजनिक ठिकाणचा वापर जाहिरातीसाठी,संबंधित अधिका-यांचे दुर्लक्ष !

कर्जतमध्ये सार्वजनिक ठिकाणचा वापर जाहिरातीसाठी,संबंधित अधिका-यांचे दुर्लक्ष !

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषद हद्दीतील आमराई पुलावरील चौकात सार्वजनिक ठिकाणी आपल्या मेडिकल स्टोअर्सची पाटी रंगवल्याने व अद्यापपर्यंत यावर कुठलीच कारवाई झाली नसल्याने संबंधित खात्याच्या अधिका-यांचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.कर्जतमध्ये आमराई पुलावरील चौकात मध्यभागी कर्जत नगर परिषदेचा लाईटचा खांब आहे.

या चौकाला यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले चौक अशा नावाची पाटी होती .काळाच्या ओघात या चौकात लाईटचा पोल नव्याने लावल्यावर येथील जुने असलेल्या पाट्या काढण्यात आल्या व त्या ठिकाणी दिशादर्शक फलक पालिकेतर्फे लावण्यात आले व कर्जत पोलीस ठाणे दिशादर्शक फलक लावण्यात आला.मात्र खाली असलेल्या सिमेंटच्या चौथऱ्यावर ” मिलन मेडिकल ” असे आपल्या मेडिकल दुकानाची जाहिरात दुकान मालकाने पेंट करून घेतलेली दिसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परिसर खराब करण्यावर मनाई असल्याने या मेडिकल दुकान मालकाला कुठलीच समज अद्यापपर्यंत देऊन ती दुकानाची जाहिरात पुसण्यात आलेली दिसून येत नाही.कोरोना संसर्ग काळात विशेष म्हणजे या चौकात नेहमीच वर्दळ ,व पोलीस चेकिंग होत असताना अशा प्रकारच्या मेडिकल दुकानाची जाहिरात पेंट झालीच कशी ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तर कोराना काळ असल्याचे कारण सांगत कर्जतमध्ये संबंधित कार्यालयाच्या अधिका-यांचे कर्जत नगरीवरचे लक्ष हटलेले या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या मिलन मेडिकल च्या जाहिरातीवरून निदर्शनास येत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page