कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित लहान बालकांसाठी 10 बेड इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरु.. - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित लहान बालकांसाठी 10 बेड इंटेन्सिव्ह केअर युनिट...

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित लहान बालकांसाठी 10 बेड इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरु..

0

(खालापुर दत्तत्रय शेडगे)
सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असल्याने सर्व जण हैराण झाले असताना पुढील काळात 3 री लाट येण्याची शक्यता वर्तवली असून या कोरोनाच्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची चिन्हे असल्यामुळे याला तोंड देण्यासाठी शासनाने पाऊलल्याने शासनाला सहकार्य म्हणून सामाजिक संस्था पुढे सरसावल्याच्या पाहायला मिळत आहेत.

याच अनुषंगाने कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेल्स फोर्स कंपनीच्या पुढाकारातून युनायटेड वे हैदराबाद , युनायटेड वे मुंबई यांच्या माध्यमातून 10 बेड इंटेन्सिव्ह केअर युनिटचे उघ्दाटन नुकतेच करण्यात आल्याने या सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा सध्या देशाला बसला आहे. मात्र ही लाट ओसरण्यापूर्वीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.

या लाटेमध्ये मुलांना कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी आतापासून तयारी सुरू केली आहे.या सर्वामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे.

तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तयारी करीत असून कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स बनवण्याचा निर्णय घेतला असताना शासनाला सहकार्य म्हणून सामाजिक संस्था, काही कारखानदारांनी मदतीचा हात पुढे केला असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित लहान बालकांसाठी सेल्स फोर्स कंपनीच्या पुढाकारातून युनायटेड वे हैदराबाद , युनायटेड वे मुंबई यांच्या माध्यमातून 10 बेड इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरू करण्यात आले असून या केअर युनिटचं उघ्दाटन नुकतेच करण्यात आल्याने हे युनिट आयसीयू बनविण्यात आले आहे.


यावेळी रा.जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी किरण पाटील, प्रातांधिकारी वैशाली परदेशी, कर्जतच्या नगराध्यक्षा सुर्वणा जोशी, कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख, बालरोग तज्ञ डॉ.एम.बी.बनसोडे, नितीन मंडलिक, जुझार सिंग, वसीम अख्तर, डॉ.मोरे, जयवंत गायकवाड, डॉ.शैलेश वागले आदीप्रमुखासह युनायटेड वे हैदराबाद , युनायटेड वे मुंबई पदाधिकारी, डॉक्टर व स्टाफ उपस्थित होता.

You cannot copy content of this page

Exit mobile version