Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील पाली - भूतवली धरण पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा...

कर्जत तालुक्यातील पाली – भूतवली धरण पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा पाहणी दौरा..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे –

कर्जत – खालापुर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी पाली – भुतवली लघु पाटबंधारे प्रकल्प योजनेवर पाहणी दौरा दि.२९ जानेवारी २०२१ रोजी आयोजित केला होता . यावेळी त्यांनी कर्जत – नेरळ या रेल्वे पट्यातील पाली – भूतवली या धरण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली व पुढील कामाचे नियोजन व कृती आराखडा तयार करण्यासाठी सबंधित विभागाला आदेश देण्यात आले.


पाली- भूतवली हे धरण प्रकल्प कर्जत – नेरळ रेल्वे पट्यात येते . २० ते २५ गावातील नागरिकांच्या जमिनी या धरण प्रकल्पात शासनाने भूसंपादन केल्या आहेत . सन १९८३ पासून या धरणाचे काम चालू झाले असताना अद्यापी ते काम पूर्ण झाले नसल्याने धरण अर्धवट आहे . मागील असलेल्या शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सांगून धरणाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या जमिनी भूसंपादन केल्या नसल्याने कालव्यांची कामे अपूर्ण आहेत.

मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी याबाबतीत चर्चा केल्याचे सांगून निधीची तरतूद करण्याची विनंती केल्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सांगितले.निधी उपलब्ध झाल्यास येथील पाणी टंचाईची समस्या दूर होईल , तर जमिनी ओलितास येतील.नवीन नियमानुसार जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाय अद्यापी भूसंपादन केलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्यांना मोबदला मिळण्याचे प्रयत्न करणार , यासाठी १० ते १५ कोटींच्या निधीची गरज आहे , ही चर्चा मा . मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या बरोबर केली असून निधी मंजूर करणार असल्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सांगितले.जेव्हढे क्षेत्र ओलिताखाली येईल व उर्वरित पाणी कर्जतकरांसाठी राखीव पाणी ठेवणार असून यावर पाणी योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या पाहणी दौऱ्यात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत अभियंता जलसंपदा विभाग राजभोज मॅडम, उप अभियंता रोकडे , शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , विधानसभा संघटक संतोषशेठ भोईर, कर्जत तालुकाप्रमुख उत्तमदादा कोळंबे, पंचायत समिति सदस्य अमर मिसाळ, उपतालुका प्रमुख दशरथ भगत , नगरसेवक संकेत भासे , विभागप्रमुख शरद ठाणगे, सुरेश बोराडे , अविनाश भासे , आसल ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी , शिवसैनिक , ग्रामस्थ उपस्थित होते . त्यांच्या पाहणी दौऱ्यामुळे व मा . मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे पाली – भूतवली धरण प्रकल्पाच्या कामाला निधी मिळून वेग येणार आहेे.

- Advertisment -

You cannot copy content of this page