Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत - दहिवली येथे श्री महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा !

कर्जत – दहिवली येथे श्री महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा !

मकर संक्रातीच्या दिवशी हजारो भाविकांची दर्शनाला हजेरी…

भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे ) -कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागात सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मकर संक्रांतीच्या निमित्ताने दहिवली ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मातेचे उत्सव श्री महालक्ष्मी ग्रामस्थ मंडळ दहिवली यांच्या वतीने रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी श्री महालक्ष्मी देवीचा अभिषेक तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती.यावेळी श्री महालक्ष्मी ग्रामस्थ मंडळ दहिवली ता. कर्जत , जिल्हा रायगड , यांच्यावतीने ह भ प प्रवीण महाराज फराट – इंजिवली यांचे सुश्राव्य कीर्तन , मृदुंगमणी ह भ प रंभाजी महाराज थोरवे – पोसरी , ह भ प अनिल महाराज फराट – इंजिवली ह भ प ओंकार महाराज म्हात्रे – तमनाथ त्याचप्रमाणे कीर्तन साथ कर्जत खालापूर परिसरातील अनेक ह भ प महाराज उपस्थित होते.
श्री विठ्ठल मंदिर चौक – दहिवली येथे रात्री ९ ते ११ या वेळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तर यावेळी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक , दहिवली ग्रामस्थ , महिलावर्ग , पत्रकार बंधू , राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले.कर्जत – दहिवली येथील श्री महालक्ष्मी माता हि साऱ्या गावाची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते .
दहिवली गावाचे जागृत देवस्थान त्याचप्रमाणे ” हाकेला धावणारी व नवसाला पावणारी ” ,अशी या मातेचे महत्त्व आहे ,आणि हे अनेकांनी अनुभवले आहे . ६५ वर्षांपूर्वी या गावांमध्ये प्लेगची साथ आली होती.गावावरील हे संकट टळावे , म्हणून त्या वेळच्या जुन्या – जाणत्या – ज्येष्ठ सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थ मंडळींनी एकत्र येऊन आपल्या श्री महालक्ष्मी मातेला साकडे घातले की , ” हे माते गावावरील हे संकट टळू दे ” , आम्ही दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी ” श्री सत्यनारायणाची महापूजा व महालक्ष्मी अभिषेक ” करून तुझे मनोभावे पूजा – अर्चा करू . त्यावेळी संकट टळले , म्हणून त्या वेळेपासून ग्रामस्थांनी बोलल्याप्रमाणे व महालक्ष्मी कृपेने ही परंपरा अखंडपणे चालू आहे.
आज ६५ वर्षे गावातील भावीक आपले घरचे कार्य समजून आनंदाने या उत्सवामध्ये सहभागी होतात , त्यामुळे ग्रामस्थांमधून सद्भावना – सतप्रवृत्ती – स्वधर्म यांची वाढ होऊन भक्तिभाव व परस्परातील प्रेमभावना यांची वृद्धी होत आहे.तर दर वर्षी या उत्सवामध्ये हजारो भाविक , महिलावर्ग श्री महालक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित रहातात.
- Advertisment -

You cannot copy content of this page