Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत नगर परिषद आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांचा आजचा संप युनियनच्या वरिष्ठांच्या आदेशाने...

कर्जत नगर परिषद आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांचा आजचा संप युनियनच्या वरिष्ठांच्या आदेशाने !

” कामावरून काढण्यात येईल ” , मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या चुकीच्या वक्तव्याचा युनियनने केला जाहीर निषेध-युनिट अध्यक्ष अरविंद मोरे..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली वर्षभरापासून कर्जत नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचा वेळी – अवेळी दिला जाणारा पगार , मेडिकल , पी.एफ . शासन मंजूर किमान वेतन ,वाढीव थकीत रक्कम , सुरक्षेची साधने , या मागण्या पालिकेतील प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ऐरणीवर असताना संविधानाने दिलेल्या कामगारांच्या न्याय – हक्क मागण्यांसाठी वरिष्ठांच्या आदेशाने केलेल्या काम बंद संपाचा चुकीचा अर्थ काढून ” कामगारांना कामावरून काढून टाकू ” असे बेताल वक्तव्य करणाऱ्या पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे कर्जत युनिट अध्यक्ष अरविंद मोरे यांनी जाहीर निषेध केला आहे.

आज दि.१४ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्रात नगर परिषद , नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असताना युनियनचे अध्यक्ष ऍड.सुरेश ठाकूर यांच्या आदेशाने येथील कामगारांच्या मागण्या देखील प्रलंबित असल्याने काम बंद आंदोलनात सर्व कंत्राटी कामगार सहभागी झाले होते . याबाबतीत पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन व चर्चा करण्यास गेलो असता , तुम्ही संपात का सहभागी झालात , तुम्हाला कामावरून काढण्यात येईल , असे बेताल व चुकीचे विधान केल्याने आक्रमक झालेले येथील युनियनचे कर्जत युनिट अध्यक्ष अरविंद मोरे यांनी पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी यांचा समाचार घेऊन जाहीर निषेध केला.
कोरोना महामारी काळात जीवाची पर्वा न करता याच पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी स्वच्छतेवर भर देत कोरोनाशी झुंज देऊन कर्जतकरांची सुरक्षा केली असताना आमचे पगार पालिका प्रशासन वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही वेळेवर देत नसल्याने आमच्या इतर मागण्या , न्याय – हक्क पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करून आमच्या कुटुंबियांना वारेवर सोडण्याचे कृत्य करत असेल तर युनियनच्या वरिष्ठांचा आदेश पाळत आम्ही संपात सहभागी झाल्यास चुकी काय केली ? यांत कर्जतकर नागरिकांना आम्ही संपात सहभागी होऊन स्वच्छतेच्या बाबतीत वेठीस धरत नाही , असे मत देखील राहुल गायकवाड यांनी व्यक्त केले.
वरिष्ठांचा आदेश आल्यावर कामगार पुन्हा कामावर येतील , तोवर आमचे काम बंद आंदोलन सुरूच राहील , कर्जतकर नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे , असे कर्जत युनिट अध्यक्ष अरविंद मोरे यांनी स्पष्ट केले . यावेळी मोठ्या प्रमाणात कंत्राटी सफाई कामगार – महिला कामगार उपस्थित होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page