Tuesday, March 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत भिसेगाव जोड रेल्वे भुयारी मार्ग काळाची गरज !

कर्जत भिसेगाव जोड रेल्वे भुयारी मार्ग काळाची गरज !

” अभी नहीं तो , कभी नहीं ” भिसेगाव ग्रामस्थांचा १२ जून पासून बेमुदत उपोषण..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव – गुंडगे व या परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना कर्जत शहरात जाण्यासाठी ४० वर्षांपासूनच्या मागणीबाबतचे कर्जत – भिसेगाव भुयारीमार्ग होणे बाबत कर्जत नगरपरिषद कार्यालयामध्ये दि. १० एप्रिल २०२३ रोजी निवेदन नगरसेवक सोमनाथ ठोंबरे तसेच माहिती अधिकार कायदा जगजागृती अभियान केंद्र , कर्जत शहर अध्यक्ष अमोघ नंदकुमार कुलकर्णी यांनी दिले होते , मात्र १५ दिवसांचा कालावधी होवूनही अद्यापी पालिका प्रशासनाने कुठलेच ठोस उत्तर न दिल्याने ” अभी नहीं तो कभी नहीं ” असा संकल्प भिसेगाव ग्रामस्थांनी केला असून याविरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून आता आरपार ची लढाई लढणार आहेत.

माहिती अधिकार कायद्याचे कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे व ग्रामस्थांनी पालिका प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनामध्ये १५ दिवसात आपण कर्जत भिसेगाव जोड रेल्वे भुयारीमार्ग बाबत योग्य प्रकारे काम चालू करावे तसेच भुयारी मार्गाबाबत यापूर्वी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार या भुयारी मार्गासाठी १५ करोड निधी मंजुरीबद्दल तसेच कर्जत नगरपरिषद मधील मासिक सभेमध्ये ” स्व.अनंता काका जोशी ” हे नाव या भुयारीमार्गाला देण्यात आले असल्याचा ठराव घेण्यात आला होता.या बाबत खुलासा करावा , अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे त्या निवेदनात कळविले होते.
परंतु आजतागायत पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने या विषयाचे गांभीर्य कर्जत नगरपरिषदला नसल्याचे दिसून येत असल्याने व भिसेगाव परिसरातील शेकडो लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम केले जात असल्याचे आरोप करून भुयारी मार्ग नक्की होणार आहे किंवा नाही ? याबाबत नगरपरिषद कडून खुलासा तसेच जो पर्यंत भुयारीमार्गाचे काम चालू करणार अथवा हे काम कधी चालू करणार आहे यावर ठोस लेखी खुलासा नगरपरिषद करत नसल्याने याचा जाब विचारण्यासाठी माहिती अधिकार कायदा जगजागृती अभियान केंद्र कर्जत शहर अध्यक्ष अमोघ नंदकुमार कुळकर्णी व त्यांचे सहकारी दि. १२ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता भिसेगाव येथील ” बिकानेर ” येथे बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आज पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना पालिकेचे विरोधी गटनेते शरद लाड , भिसेगाव नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , गुंडगे नगरसेवक उमेश गायकवाड , आर टी आय कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी, रमेश देशमुख, जगदीश दिसले, सुनील चव्हाण, गौतम मोहिते,अतिष राऊत,अतिष देशमुख आदी ग्रामस्थ उपस्थित होते व याची प्रत मा.जिल्हाधिकारी रायगड , मा. तहसीलदार – कर्जत , मा .पोलीस निरीक्षक कर्जत, यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया: भुयारी मार्ग हा काळाची गरज असून सर्वांसाठी उपयोगी असल्याने व वाहनधारकांची वेळ वाचत असल्याने ते होणे महत्त्वाचे आहे.
———- (नगरसेवक , सोमनाथ ठोंबरे)

प्रतिक्रिया: भुयारी मार्ग मधील अडथळे दूर करून राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी काम करावे व भिसेगाव परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा
__ (अमोघ कुळकर्णी, आर टी आय कर्जत)

- Advertisment -

You cannot copy content of this page