Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड यांच्या वतीने रक्तदान शिबिर...

कर्जत येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन…

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)

दि.22 कर्जत-खालापूर तालुक्यातील 413 वे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.प्रतिवर्षीप्रमाणे श्री राम जन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपूर्ण देशभरात रक्तदान शिबिर आयोजित करत असतात.

यावर्षी सुद्धा श्री कपालेश्वर देवस्थान येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते .यावेळी covid19 च्या संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरून सामाजिक अंतर पाळून वरील कार्यक्रम करण्यात आले होते.कोविड काळात पुर्ण वेळ समाजाची वैद्यकीय काळजी घेणाऱ्या डॉ,संजीवकुमार पाटील BHMS, रायगड उपजिल्हा रुग्णालय कोविड वॉर्ड कर्मचारी , डॉ संगीता दळवी,डॉ जयश्री म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आले होते.याप्रसंगी कोविडच्या काळात विहिंपच्या वतीने धान्य वाटप केले असताना आर्थिक हातभार लावणाऱ्या कुणाल पाटील,सतीश श्रीखंडे,राहुल कुलकर्णी,महेश गोळे,प्रसाद वैद्य,सुहास बडेकर यांच्या मदतीची ही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण रक्तपेढी घाटकोपर यांनी रक्तसंकलन केले. एकूण ६२ रक्तदात्यानी यावेळी रक्तदान केले.

यावेळी कोकण प्रांत बजरंग दल संयोजक संदीप भगत,कुलाबा जिल्हा मंत्री रमेश मोगरे,तालुका संघचालक विनायक चितळे,बजरंग दल कुलाबा जिल्हा संयोजक साईनाथ श्रीखंडे कर्जत प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये,प्रखंड मंत्री विलास जोशी प्रखंड संयोजक कमलाकर किरडे अनंता हजारे,सचिन ठाकूर तेजस दाभणे,महेश बडेकर,केदार भडगावकर,रमेश नाईक इत्यादी आदीसह उपस्थित होते.

याठिकाणी रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीच्या डॉ पल्लवी जाधव,लक्ष्मण नाईक काका प्रकाश एवाळे इत्यादींनी केले होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page