Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे स्थानकातील ब्रिज दुरुस्तीचे काम महिना होत आला तरी धिम्या गतीने...

कर्जत रेल्वे स्थानकातील ब्रिज दुरुस्तीचे काम महिना होत आला तरी धिम्या गतीने !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे कडील बाजूच्या ब्रिजच्या दुरुस्तीचे काम २० डिसेंबर २०२२ पासून सुरू झाले असून आज १० जानेवारी २०२३ तारीख आली तरी ब्रिजचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून उर्वरित काम १० दिवसांत होणार नसल्याने रेल्वे प्रवाशांना आतापर्यंत झालेल्या छोट्या – मोठ्या किरकोळ अपघातामुळे व या परिसरात रहाणारे गुंडगे – भिसेगाव – जुने एस टी स्टँड परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांत संताप पसरला असून काम अधिक गतीने करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कर्जत न.प. चे प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी केली आहे.
तब्बल एक महिना हा ब्रिज रेल्वे प्रवासी व पश्चिम भागाकडे रहाणाऱ्या भिसेगाव , गुंडगे , स्टँड परिसर , व इतर नागरिकांना ये – जा करण्यास बंद झाला आहे . तर मुंबई कडे कामासाठी जाणारे प्रवासी , तसेच उल्हासनगर , अंबरनाथ , बदलापूर येथे एम आय डी सी कंपनीत जाणारे चाकरमणी , कामगार वर्ग , महिला कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने घरी जाताना बाजारहाट करण्यासाठी बाजारात जाताना धोक्याची रेल्वे ट्रॅक पार करून जाताना खडीत पाय मुरगळणे , पायाला लोखंड लागणे , पाय घसरून पडल्याने होणारा अपघात त्यामुळे नागरिकांची आतापर्यंत खूप छोटे – मोठे अपघात घडले असून नागरिकांत व रेल्वे प्रवासी वर्गात रेल्वे प्रशासनाविरोधात संताप खदखदत असताना या महिनाभराच्या कामात फक्त १० दिवस शिल्लक असल्याने होणारे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून उर्वरित १० दिवसांत रेल्वे ब्रिजचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत.रेल्वे ब्रिज सक्षम होणे , हि काळाची गरज असताना अद्यापी उर्वरित काम , कामाचे परिक्षण हे अद्यापी बाकी आहे.
रेल्वे प्रवासी तसेच भिसेगाव , गुंडगे व पश्चिम भागातील जुने एस टी स्टँड परिसरातील नागरिकांना बाजारहाट , शाळा , दवाखाना , शासकीय कामे , बँकेची कामे , नगर परिषदेची कामे करण्यास जीवाची जोखीम घेऊन तारेवरची कसरत करून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . म्हणूनच उर्वरित काम अधिक गतीने होऊन १० दिवसांत म्हणजे २० जानेवारी २०२३ रोजी पूर्ण होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठेकेदारावर दबाव आणावे , व यासाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे पदाधिकारी , नॅशनल रेल्वे मजदूर युनियन , सेंट्रल रेल्वे मजदूर संघ , मनसे रेल्वे युनियन , शिवसेना प्रणित लोकाधिकार समिती , एस सी एस टी एम्प्लॉईज युनियन यांनी देखील दबाव तंत्राचा वापर करून काम लवकरात लवकर करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page