Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकलोते-नडोदे रस्त्याला मुहूर्त कधी लागणार,,, नागरिक हैरान,,,, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा...

कलोते-नडोदे रस्त्याला मुहूर्त कधी लागणार,,, नागरिक हैरान,,,, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा…

खालापूर- (दत्तात्रय शेडगे) सध्याच्या काळात अन्न-वस्त्र-निवारा सोबत वीज,पाणी आणि रस्ता या देखील माणसाच्या मूलभूत गरजा बांगला आहेत, कलोते ते नडोदे या रस्त्याला मुहूर्त कधी लागणार अशी विचारणा नागरिकांच्या तून होत आहे.

सन 2009-10 साली पंतप्रधान ग्राम सडक योजने मार्फत सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून सदरील रस्ता बनविण्यात आला होता, मात्र काही कालावधीतच रस्त्याची दुर्दशा झाली, सदरील रस्ता दुरुस्तीचे काम मोनिका कंट्रक्शन क्या ठेकेदाराकडे होते मात्र या ठेकेदाराने या रस्त्याकडे ढुंकून देखील पाहिले नसल्याने सदर रस्त्याची दुरावस्था झाली, तसेच पाच वर्ष देखभाल दुरुस्तीचे काम देखील याच ठेकेदार कंपनीकडे होता ते देखील त्यांनी व्यवस्थित रित्या न केल्याने रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला, याच रस्त्याला लागून मुंबईतील धनदांडगे यांचे फार्म हाऊस आहेत, याच रस्त्याला फार्म हाऊस वाल्यांनी दोन्ही बाजूने वॉल कंपाऊंड बांधल्याने सदर रस्ता अरुंद असल्याने रस्त्याला अपघात होण्याची शक्यता आहे.

रस्ता बनवून दहा वर्ष झाला नाही आता मात्र या रस्त्याची अवस्था फारच बिकट झाले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी चर्चा स्थानिक नागरिकांची होत आहे.सदर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मार्फत मंजूर झाले असल्याचे समजल आहे, मात्र या रस्त्याला मुहूर्त कधी लागणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, सदरील महिना हा मे महिना असून पुढील महिन्यात पावसाला सुरू होण्याची शक्यता आहे, येत्या पंधरा दिवसात जर सदर रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास यावर्षी मात्र मोठी बिकट अवस्था होणार असून छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही, सदरील रस्ता अरुंद असल्याकारणाने वेडीवाकडी वळणे आहेत यातच अपघात होतात.

यावर्षी मात्र संपूर्ण रस्ता पावसाच्या पाण्याखाली वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.चौकट(कोट)- नडोदे ते कलोते फाटा हा जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता असून या रस्त्यावरून मोटर सायकल घेऊन जाणे मोठे जिकरीचे झाले आहे, याच रस्त्याला मोठे खड्डे असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-सुमित भालेराव,स्थानिक ग्रामस्थ, नडोदे

या रस्त्यावर आम्ही अनेक वर्ष पायी प्रवास करत आहोत, शाळकरी विद्यार्थी व मोटारसायकल तसेच कार चालक यांची नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते, रस्ता नादुरूस्त असल्याकारणाने आम्हाला रस्त्यावर चालने देखील मोठे जिकरीचे आहे.

– प्रशिक तातवडे, ग्रामस्थ, नडोदे

- Advertisment -

You cannot copy content of this page