Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" काका फिटनेस सेंटरचा पॉवर मॅन " बबन झोरे चे विक्रमावर...

” काका फिटनेस सेंटरचा पॉवर मॅन ” बबन झोरे चे विक्रमावर विक्रम !

OVERAL STRONG MAN हा किताब हि त्यांच्या नावावर..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)नुकतीच नवी मुंबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग डेड लिफ्ट आणि बेंच प्रेस यामध्ये नॅशनल चॅम्पियन कु . बबन बाबू झोरे यांनी दोन गोल्ड मेडल आणि तीन स्ट्रॉंग मॅन , स्ट्रॉंग मॅन ऑफ ब्रेंच प्रेस , आणि स्ट्रॉंग मॅन ऑफ डेड लिफ्ट हे दोन्ही अवार्ड आपल्या नावावर केले. यापूर्वी त्याने STRONG MAN OF INDIA या पुरस्काराचा मानकरी ठरला असताना त्याचे एकावर एक विक्रमाने त्याच्यावर रायगड जिल्ह्यासहित कर्जत – खालापूर मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कर्जत तालुका – रायगड जिल्हा – मुंबई – राज्यस्तरीय – देशातील अनेक राज्यात अव्वल ठरलेला काका ‘स फिटनेस सेंटर कर्जत मधील अष्टपैलू व्यायामपट्टू बबन बाबू झोरे यापूर्वी देशात अव्वल ठरला असून ” STRONG MAN OF INDIA ” या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
त्याच्या नावावर आतापर्यंत सर्व स्तरातील अव्वल दर्जाची रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक मिळाले आहेत . दिसायला साधा – सरळ व कमी उंचीचा असलेला बबन स्पर्धेत उतरल्यावर एव्हढा मोठा पराक्रम करेल , हे स्पर्धेतील इतरांना वाटत देखील नाही ,मात्र एक वेगळीच जिद्द- चिकाटी व जिंकण्याची ऊर्जा त्याच्यात डोळ्यात दिसत असल्यानेच हैद्राबाद येथे भारत सरकारच्या नॅशनल लेव्हल २०२१ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १८  राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेश स्पर्धकांच्या लढतीत कर्जत तालुक्यातील काका ‘ स फिटनेस मधील अष्टपैलू ” महाराष्ट्राचा वाघ –  बबन ” हा महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना एकूण ४९० किलो वजन उचलून ” गोल्ड मेडल ” आणि या संपुर्ण स्पर्धेतील सर्वांत मोठा पुरस्कार तो फ़क्त एकच खेळाडूला दिला जातो तो म्हणजे ”  STRONG MAN OF INDIA  ” हा किताब त्याने आपल्या नावावर त्याने कोरला.

बबन झोरे आपले प्रशिक्षण कर्जत मधील नामांकित काका ‘ज फिटनेस सेंटर कर्जत मध्ये घेतो . या स्पर्धेचा सर्व खर्च व सहकार्य काका फिटनेसचे मालक मयुरशेठ जोशी ,चालक अमित गुप्ता सर करतात या यशाच्या श्रेयामध्ये अमित गुप्ता सरांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य असते , असे बबन झोरे यांनी हि विजयीश्री मिळाल्यावर मत व्यक्त केले . या स्पर्धेत बबन ११५ किलो बेंच प्रेस आणि २१२ . ५ किलो डेड लिफ्ट उचलून ” OVERAL STRONG MAN ” हा किताब देखील त्याने आपल्या नावावर कोरला.काका ज फिटनेस सेंटरचे कोच केदार चौधरी व प्रशांत डोकते – कोच यांचे सहकार्य हि लाखमोलाचे असते.या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे काका’स फिटनेस सेंटर कर्जतचे सर्वेसर्वा बंटीशेट तथा मयूर जोशी , नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांनी त्यांच्या या रेकॉर्डब्रेक कामगिरी बद्दल खूप खूप अभिनंदन करून पुढील वर्ल्ड एशियन स्पर्धेत ” जगज्जेता ” होण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page