Friday, March 29, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत खिंडीत इको आणि ट्रकचा भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू तर एक...

कामशेत खिंडीत इको आणि ट्रकचा भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर…

कामशेत : मुंबई पुणे जुन्या महामार्गावर कामशेत खिंडीत आज पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भिषण अपघातात कार मधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे . राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन ( वय 44 , रा . कळवा , ठाणे ) व औतार गुरुदयाल सिंग सेहेरा ( वय 50 , रा . कोपरी , ठाणे ) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर नितेशकुमार देवेंद्रकुमार जैन हे या अपघात गांभिर जखमी झाले आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , आज सोमवारी ( दि .4 ) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला . मुंबईहून पुण्याच्या दिशेने लाकडं घेऊन निघालेला कंटेनर हा वळण व उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन मुंबई लेनवर गेला . यावेळी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेली इको कार क्र . MH 46 P 3634 ही सदरचा कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला.

यामध्ये जैन व सेहेरा यांचा मृत्यू झाला तर नितेशकुमार जैन हे गंभिर जखमी झाले आहेत . त्यांच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत . कामशेत पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page