Thursday, April 18, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत पोलिसांनी शहरात दहशत पसरविणार्‍या पाच जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हे केले दाखल...

कामशेत पोलिसांनी शहरात दहशत पसरविणार्‍या पाच जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हे केले दाखल…

कामशेत :शहरात संघटित पणे गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या टोळीच्या पाच जणांना कामशेत पोलिसांनी ठोकल्या बेडया ” मोक्का” अंतर्गत होणार कारवाई.

कामशेत शहरात दहशत मजवीणाऱ्या टोळीचा म्होरक्या धनेश शिंदे व त्याचे साथीदार रोशन शिंदे, अनिकेत शिंदे, श्रीधर हुले, प्रणीत दाभाडे यांनी मागील 10 वर्षात संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने सुरु ठेवलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे त्यांच्यावर ” महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ” ( मोक्का ) कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव कामशेत पोलीस ठाण्यातून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रस्तावाला मंजुरी देताच कामशेत पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून फरार आरोपींना अटक केली आहे. मोक्का विशेष न्यायालयाने या पाच ही जणांना बुधवार दि 8 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या आरोपींनी 17 सप्टेंबर रोजी कामशेत शहरात दुपारी 3 च्या सुमारास एका बांधकाम व्यवसायिकाच्या कार वर लोखंडी हत्याराने व लाकडी दांडक्याने हल्ला करून व्यवसायिकालाही जबर मारहाण करत त्याच्या जवळील 37 हजार 100 अशी रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून फरार झाले होते.

या टोळीच्या पाच जणांना कामशेत पोलिसांनी चतुराईने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे.

कामशेत शहरात दहशत मजवीणाऱ्या टोळीचा म्होरक्या धनेश शिंदे व त्याचे साथीदार रोशन शिंदे, अनिकेत शिंदे, श्रीधर हुले, प्रणीत दाभाडे यांनी मागील 10 वर्षात संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने सुरु ठेवलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे त्यांच्यावर ” महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ” ( मोक्का ) कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव कामशेत पोलीस ठाण्यातून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रस्तावाला मंजुरी देताच कामशेत पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून फरार आरोपींना अटक केली आहे. मोक्का विशेष न्यायालयाने या पाच ही जणांना बुधवार दि 8 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर फरार आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक पी. डी. माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. ए. शेख, पोलीस हवालदार ए. जे. दरेकर, एस. ए. शेख, एम. आर. माने, पोलीस नाईक जी डी तावरे, एम. व्ही. धेंडे,एच. बी. माने, एस. बी. गवारी, पी. आर. विरणक, एच. डी. वाळुंज, ए. एस. हिप्परकर, ए. व्ही. झगडे, जी. के. केदारी, व्ही. व्ही. नागलोथ, महिला पोलीस कॉन्स्टेबल एच. एच. कुंदे, डी. एच. शिंदे, आर. आर. राउळ यांच्या पथकाने आरोपींना मोठया शिताफिने ताब्यात घेतले असून पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page