Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकेंद्रिय मंत्री नारायण राणेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी खालापूर खोपोली पोलिस ठाण्यासह...

केंद्रिय मंत्री नारायण राणेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी खालापूर खोपोली पोलिस ठाण्यासह खालापुर तहसिलदारांना खालापूर शिवसेनेनी दिले निवेदन..

खालापूर (दत्तात्रय शेडगे )
दिनांक २३ अॉगस्ट रोजी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्य विधान केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी केंद्रिय मंत्री याचा निषेध दर्शवत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली असता याच अनुषंगाने खालापूरातील शिवसैनिक – युवासैनिक – महिला आक्रमक झाले असून केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा या संदर्भात 24 अॉगस्ट रोजी खालापूर – खोपोली पोलिस ठाण्यासह खालापुर तहसिलमध्ये निवेदन देत केंद्रिय मंत्री राणे यांच्या निषेध करित मंत्री राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली असता याच यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री राणे यांनी 23 अॉगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्य विधान केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेच्या भावना दुखावल्या असून केंद्रीय मंत्री राणे यांच्या आक्षेपार्य विधाना विरोधात ठिकठिकाणी शिवसैनिक – युवासैनिक – महिला आघाडीच्या वतीने निदर्शने दाखवत केंद्रीय मंत्री राणे याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.


तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्य विधाना विरोधात खालापूरातील शिवसैनिक – युवासैनिक आक्रमक झाले असून केंद्रिय मंत्री राणेंंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी खालापूर – खोपोली पोलिस ठाण्यासह खालापूर तहसिलमध्ये 24 अॉगस्ट रोजी निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे, शहरप्रमुख सुनिल पाटील, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, शिवसेना समन्वयक एकनाथ पिंगळे, सल्लागार शशिकांत देशमुख, संपर्कप्रमुख उमेश गावंड, पंचायत समिती सदस्य उत्तम परबळकर, प्रशांत खांडेकर, राजू गायकवाड, दिलीप पुरी, भाऊ सणस, हरेश काळे, संतोष मालकर, अमोल जाधव, विवेक पाटिल, विलास चालके, रोहीदास पिंगळे, रोहीत विचारे, संतोष पांगत, अविनाश किर्वै, बंटी नलावडे, गिरिश जोशी, तात्या रीठे, रेश्मा आंग्रे, प्रिया जाधव, सुरेखा खेडकर आदीप्रमुखासह शिवसैनिक – युवासैनिक – महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page