Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडके ई एस इंग्लिश मिडीयम स्कुल कर्जत व कडाव येथे मुलींनी मारली...

के ई एस इंग्लिश मिडीयम स्कुल कर्जत व कडाव येथे मुलींनी मारली बाजी..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील आमराई येथील के. इ. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल ही संस्था विद्यार्थ्यांना सुयोग्य व प्रगती करणारी म्हणून नामांकित आहे.दरवर्षी या संस्थेच्या कर्जत व कडाव येथील शाळा १० वी चा रिझल्ट १०० टक्के नी गुणवत्तेत येऊन विद्यार्थी पास होत असल्याने या शाळेंचा गुणगौरव सर्वदूर पसरत चालला आहे.

अतिशय हुशार विद्यार्थ्यांची मशागत येथील शिक्षक वर्ग करत असून संस्थेचे संचालक देखील लक्ष देऊन शिस्तबद्ध पद्धतीने संस्था चालवीत असल्याने १० वीत दर्जेदार गुण मिळवून जीवनाच्या उंबरठ्या बाहेर पाऊल टाकताना विद्यार्थी सर्वगुणसंपन्न, शिस्तप्रिय ,व आपल्या तल्लख बुद्धीने जग जिंकण्यास भरारी घेताना तेजोमय लखलखीत होऊन बाहेर पडतानाचे या १०० टक्के रिझल्ट व घवघवीत यशावरून दिसून येत आहे.


के.इ.एस.इंग्लिश मिडीयम स्कुल कर्जत व कडाव शाळेचा १० वी इयत्तेचा २०२१ सालचा रिझल्ट १०० टक्के निकाल लागला असून या दोन्ही शाळेत मुलींनी चांगले यश मिळवून बाजी मारली आहे.कर्जत शाळेत १४५ विदयार्थी पैकी ७७ विद्यार्थी घवघवीत गुण मिळवून तर फर्स्ट क्लास मध्ये ५० विद्यार्थी , सेकंड क्लास मध्ये १७ व पास क्लास ०१ विद्यार्थी अशी गुणवत्ता मिळाली आहे.

यांत टॉपर विद्यार्थी – देवश्री उदय गुजराथी – ९९ टक्के ,यशराज श्यामराव पाटील – ९७.६० टक्के ,तृप्ती कृष्णा थोरवे – ९७.२० टक्के , सोनाली विजय कोंडीलकर ९६. ६०टक्के , कौशिक अनंत थोरवे ९३ टक्के ,सानिया पराग साळुंके – ९२ टक्के ,मीना राजू चव्हाण – ९१ टक्के , श्रावणी संतोष जोशी – ९०.६०टक्के , तनुश्री सचिन गुप्ता – ९०.२०टक्के , सोहम शशिकांत बैलमारे – ८९.८० टक्के , पियुष सात्विक बोरसे – ८९ .८० टक्के ,श्लोक उदय चव्हाण – ८९.६० टक्के,दिपाली शंकरदत्त पांडे – ८८.८० टक्के , मानसी संतराम दुबे – ८८. ६० टक्के , चिन्मयी रामराव पाटील – ८८ .६० टक्के ,रिद्धी राहुल गायकवाड – ८८ .४० टक्के , भूमी रमेश भरकले-८८.२० टक्के ,मनीष रोहिदास पाटील – ८८ .२० टक्के ,आदी विद्यार्थी आहेत.तर कडाव के.इ.एस.शाळेत ९० टक्के पेक्षा जास्त ०२ विद्यार्थी , ८० ते ९० टक्के पर्यंत १४ , फर्स्ट क्लास – ०६ , तर सेकंड क्लास – ०३ विद्यार्थी असून सानिया पराग साळुंके – ९२ टक्के , मीना राजू चव्हाण – ९१ टक्के , दिपाली शंकरदत्त पांडे – ८८.८० टक्के , करण नारायण धुळे – ८७.२० टक्के , करिष्मा प्रभू प्रजापती – ८६ .४० टक्के असे विद्यार्थी टॉपर लिस्टमध्ये आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक सतिशशेट पिंपरे यांनी अभिनंदन करून पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page