Thursday, April 18, 2024
Homeपुणेकामशेतकोंबड्या चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.. पाच चोरटे जेरबंद !

कोंबड्या चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.. पाच चोरटे जेरबंद !

कामशेत : कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील जुना मुंबई पुणे महमार्गावरील अहिरवडे फाट्यावर कोंबड्या वाहू टेम्पो चोरी गेल्याची घटना बुधवार दि.30 रोजी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास घडली होती.या संदर्भात टेम्पो चालक जमाल अहमद अताउल्ला खान ( वय 35 ) यांनी कामशेत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती सदर फिर्यादेवरून तपास करत कामशेत पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी चोरीस गेलेला कोंबड्यांचा टेम्पो हस्तगत केला परंतु या गुन्ह्यातील आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही.

या गुन्ह्यात आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून हा कोंबड्यांनी भरलेला टेम्पो एकूण 12,30,000 रु. किंमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. त्याबाबत कामशेत पोलिस स्टेशन येथे गु.रजि.नं. 38/2022, भादंवि कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हयामध्ये शेतकरी पोल्ट्री व्यवसायिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सुचना दिलेल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहा फौजदार शब्बीर पठाण, प्रकाश वाघमारे, पो हवा राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, पो ना अमोल शेडगे, पो काॅ धिरज जाधव, प्राण येवले, दगडू विरकर म पो काॅ पुनम गुंड यांचे पथक नेमले होते.

नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वैभव विद्याधर सरोदे उर्फ होगाडे यास पैशाची गरज होती त्यामुळे त्यानेच सदरचा गुन्हा हा त्याच्या साथिदारांसह केलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हा शाखा पथकाने वैभव विद्याधर सरोदे उर्फ होगाडे यास शरद नगर चिखली पुणे येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या इतर साथिदारांसह केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे गुन्हयातील निष्पन्न रॉकी मोंटू शेख (रा. साने वस्ती कॉर्नर अमिर चिकनदुकान नेवाळे वस्ती चिखली, पुणे मूळ रा. मशीद बाग,केशरडाग, कलकत्ता) सुखउद्दीन जलालुद्दीन शेख( रा.सावरी चिकन सेंटर नेवाळे वस्ती, चिखली,पुणे ) देविदास संतोष काकडे (रा. नेवाळे वस्ती, चिखली, पुणे ) वैभव लक्ष्मण कांबळे (रा. शरद नगर, चिखली, पुणे ) असे एकुण 5 जण ताब्यात घेतले असून गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक पवार, कामशेत पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page