Friday, March 29, 2024
Homeपुणेकामशेतकोथुर्णे येथील स्वराचे अपहरण करून हत्या करणारा 24 तासात जेरबंद...

कोथुर्णे येथील स्वराचे अपहरण करून हत्या करणारा 24 तासात जेरबंद…

कामशेत प्रतिनिधि : कोथुर्णे हद्दीत मंगळवारी ( दि .2 )रोजी दुपारी 3:30 वा . अपहरण झालेल्या बालिकेचा अखेर संशयास्पद अवस्थेत बुधवारी ( दि . 3 ) रोजी दुपारी मृतदेह सापडला असून आरोपीला 24 तासाच्या आत पोलिसांनी जेरबंद केले .

आरोपी तेजस उर्फ दादा महीपती दळवी ( वय 24 ) असे अटक आरोपीचे नाव आहे . पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दि . 2 रोजी दुपारी 3:30 वाजता कामशेत पोलीस स्टेशन हददीत कोथुर्णे या गावात एका अल्पवयीन मुलीचे कोणीतरी तिच्या राहते घरासमोरुन अपहरण केले बाबत तिच्या वडीलांनी पोलीस स्टेशनला येवून माहीती दिली होती . सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन वडीलांच्या तक्रारीवरून कामशेत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 117 / 2022 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन संपूर्ण गावात अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरु केला . पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते , लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले आदींनी घटनास्थळी भेट देवुन अपहरण झालेल्या मुलीचा संपुर्ण गावात शोध घेवून तपासाला गती देण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक अशोक शेळके , कामशेत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय जगताप , वडगाव मावळ पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार , नेताजी गंधारे , संदेश बावकर , निलेश माने , पोलीस उप निरीक्षक प्रदीप चौधरी आदींची वेगवेगळी तपास पथके तयार केली.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते , लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप , सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार , पोलीस उपनिरीक्षक , शुभम चव्हाण , सहा फौजदार प्रकाश वाघमारे , शब्बीर पठाण , पोलीस हवालदार हनुमंत पासलकर , प्रमोद ” नवले , पोलीस नाईक समाधान नाईकनवरे , पोलीस अमलदार प्राण यवले , सहाय्यक फौजदार समीर शेख , पोलीस हवालदार गणेश तावरे , टिक्कु दिक्षीत , सागर बनसोडे , रवींद रॉय , अनिल हिप्परकर , अनिल कळसाईत , आशिष झगडे , रविंद्र राऊळ , होमगार्ड प्रशांत कटके , किसन बोंबले यांच्या पथकाने केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page