Friday, March 29, 2024
Homeपुणेवडगावकोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना वडगाव नगरपंचायत व रेल्वे प्रशासनाकडून मिळणार...

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना वडगाव नगरपंचायत व रेल्वे प्रशासनाकडून मिळणार मासिक पास…

वडगाव : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता सद्य परिस्थितीत सुरू असलेली लोकलसेवेतून लोणावळा – पुणे प्रवास करता येणार आहे. या प्रवासासाठी आवश्यक असणारा सिझन अथवा मासिक पास स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या.


त्यानुसार वडगाव नगरपंचायतने नागरिकांसाठी हि सुविधा रेल्वे तिकीट घराजवळच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना पास घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालय अथवा अन्यत्र कोठेही जाण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले आहे.


राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांचे आदेशाने तहसिलदार मधुसूदन बर्गे, रेल्वे प्रशासन पदाधिकारी व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेत तसेच लसीचा दुसरा डोस घेऊन पंधरा दिवस झालेल्या नागरिकांना दोन्ही लसीचे प्रमाणपत्र व आधार कार्ड दाखविल्यास त्यांना मासिक पास देण्यात येणार आहे.


याकरिता आजपासून वडगाव नगरपंचायतचे चार कर्मचारी व रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी हे वडगाव स्थानकावर तिकीट घराच्या बाहेर रोज सकाळी ७ ते सायंकाळी ११ यादरम्यान टेबल लावून बसणार आहेत.त्याच ठिकाणी लस घेतलेल्या प्रमाणपत्राचे व्हेरिफिकेशन करुन त्यावर नगरपंचायतचा शिक्का देत नागरिकांना पास देण्यात येणार आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page