Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळाखंडाळा चेक पोस्टवरील शासकीय कामकाजात राजकारण्यांचा अडथळा...

खंडाळा चेक पोस्टवरील शासकीय कामकाजात राजकारण्यांचा अडथळा…

मावळातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद असताना आणि लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीसांकडून खंडाळा येथे चेक पोस्ट लावली असतानाही लोणावळा शहरातील लायन्स पॉईंट, लोणावळा लेक, तुंगार्ली व लोणावळा बाजारपेठेत बाहेरील नागरिकांचा वावर मोठया प्रमाणात दिसत आहेत.

विनापरवाना बाहेरील नागरिकांना शहरात येण्यास बंदी असून लोणावळ्यात होणाऱ्या बाहेरील नागरिकांची गर्दी यासंदर्भात आढावा घेत असताना एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्यावतीने लावण्यात आलेल्या खंडाळा येथील चेक पोस्ट वर गेली तीन महिन्यांपासून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी IPS नवनीत कॉवत, लोणावळा पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दैनंदिन मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या खंडाळा येथील चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांना स्थानिक व उच्चस्तरावरील राजकारण्यांकडून फोन वरून दबाव टाकण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती उघडकीस आली आहे.

आणि त्याचमुळे शहरात विनापरवाना फिरणाऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. चेक पोस्ट वर लोणावळ्यात मुंबईहून येणाऱ्या नागरिकांचे e – pass तपासणी करून त्यांची एन्ट्री करणे व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे ही सर्व कामे अगदी पारदर्शकपणे सुरु असून विनापरवाना शहरात शिरू पाहणाऱ्यांना मात्र परतीचा मार्ग दाखविण्यात येत आहे.त्यातच एवढे चोख काम करत असताना तेथील स्टाफवर बाहेरून येणाऱ्यांसाठी राजकारणी व शासकीय पदाधिकारी हे फोन करून विनापरवाना येणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या नागरिकांना परवानगी दया असे सांगितल्याने येथील कर्मचाऱ्यांचा नाईलाज होत असून त्यांना आपले कार्य पार पडण्यास अडथळा निर्माण होत आहे.

त्याचप्रमाणे खंडाळा चेकपोस्ट वरील शासकीय कामकाजात वारंवार अडथळा निर्माण होत असून तिथे कामगिरी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा त्रास सोसावा लागत आहे. तर कधी कधी हे कर्मचारी लाच घेऊन शहरात घुसण्याची परवानगी देत असल्याचा आरोपही त्यांना सहन करावा लागत आहे. एवढे सहन करून मात्र येथील पोलीस व नगरपरिषदेचे कर्मचारी आपली कामगिरी पार पाडत आहे. सदर चेक पोस्टवर सहा पोलीस कर्मचारी आणि सहा नगरपरिषदेचे कर्मचारी असा स्टाफ दिवसरात्र आपला जीव धोक्यात घालून आपली कामगिरी बजावत आहेत.ह्या कोरोना विरोधी लढ्यातील कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करा व त्यांना त्यांच्या कार्याबद्दल प्रोत्साहन दया असे आवाहन ” अष्ट दिशा ” न्युज कडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page