Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर खोपोली येथील कोविड सेंटरला पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली भेट..

खालापूर खोपोली येथील कोविड सेंटरला पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली भेट..

खालापूर खोपोली येथील कोविड सेंटरला पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली भेट स्थानिक प्रशासन आणि लोकसहभागातून उभारलेले कोविड सेंटर पाहून व्यक्त केले समाधान.

खोपोली- दत्तात्रय शेडगे

दि 10.खालापूर येथे जे.जी.एम.स्कूल येथे लोकसभागातून तयार करण्यात आलेल्या 50 बेडची सुविधा असलेल्या कोविड केअर सेंटर व खोपोली नगरपालिकेने उभरलेल्या कोविड सेंटर ला पालकमंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

खालापूर येथील कोविड केअर सेंटर जे.जी.एम.स्कूल येथे 50 बेडचे असून यातील दोन बेड ऑक्सिजन सुविधा असलेले असून हे कोविड केअर सेंटर खालापूर नगरपालिका, महसूल, आरोग्य यंत्रणा, नगरपंचायत आणि लोकसहभागातून व प्रयत्नांतून तयार करण्यात आले आहे तसेच येथे वैद्यकीय सेवा खासगी डॉक्टरांकडून विनामूल्य देण्यात येते.

या कोविड केअर सेंटरमधील नियोजन पाहून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी समाधान व्यक्त करुन कोविड केअर सेंटर उभे करण्यात परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे, विनामूल्य वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक केले यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, एच.आर.पाटील, पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील, .नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक संतोष जंगम, उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी, तहसिलदार इरेश चप्पलवार, खालापूर नगरपालिका मुख्याधिकारी सुरेखा भणगे, गटविकास अधिकारी भोये, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.शाह, विजय सावंत, राजेश पारठे तसेच खासगी वैद्यकीय सेवा देणारे कौस्तुभ जोशी, डॉ.मोरे, डॉ.गुंडरे, डॉ.मिश्रा उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page