Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीतील सरस्वती निकम यांचे उपोषण नगरपालिकेच्या लेखी आश्वासनानंतर मागे...

खोपोलीतील सरस्वती निकम यांचे उपोषण नगरपालिकेच्या लेखी आश्वासनानंतर मागे…

खोपोली – शांतीनगर या ठिकाणी राहत असलेले निकम परिवार व यांच्या घरा समोर अन्य परिवाराने केलेल्या अनाधिकृत बांधकामांविरोधात अनेकदा पालिका प्रशासनाकडे मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने होणार्‍या रोजच्या त्रासाला कंटाळून सरस्वती दत्ता निकम यांनी खोपोली नगरपालिके समोर दि. 31 मार्च रोजी पासून उपोषणाला सुरुवात केली होती.

पाहिल्या दिवशी खोपोली नगरपालिकेकडून उपोषणकर्त्या सरस्वती निकम यांना उपोषण मागे घेण्याबाबत तीन ते चार वेळा नगरपालिका अधिकारी व मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली व कारवाई साठी 30 दिवसाचा कालावधी लागेल असे लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती.परंतु उपोषणकर्त्या सरस्वती निकम यांना समाधान कारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी उपोषण मागे न घेण्यावर ठाम राहिल्या यादिवशी आम आदमी पार्टी व अन्य जणांनी त्यांना पाठींबा दिला. त्यानंतर आज दि.1 एप्रिल उपोषणाचा दुसरा दिवस उजडताच शहरातील आम्ही खोपोलीकर आमच ठरलय संघटना , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्षा सुवर्णा गायकवाड , शिवसेना महिला शहर संघटिका सुरेखा खेडकर व अनेक आजी – माजी नगरसेवक , कार्यकर्ते तसेच अनेक संघटनांनी उपोषणकर्त्यांना पाठींबा दिला.

नगरपालिकेसमोर सुरू असलेल्या दोन दिवसाच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या सूचनेनुसार कालावधी दिलेल्या तारखेच्या 7 दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन नगरपालिका अधिकारी टीम यांनी उपोषणकर्त्यांना लेखी स्वरुपात दिले असता उपोषणकर्त्यां सरस्वती निकम यांना सदरील मागणी मान्य नव्हती त्यांचे म्हणणे होते की , नगरपालिका अधिकाऱ्यांनी आमची कायम फसवणूक केली व यापुढेही आमची फसवणूक केली जाईल.

परंतु खोपोली नगरपालिका अधिकारी टीम यांच्या सह उपस्थित शिवसेना पक्षाच्या शहर संघटिका सुरेखा खेडकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा सुवर्णा गायकवाड , राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते संजय गायकवाड , तसेच पत्रकार मित्र तय्यब खान , मेहबूब जमादार , शेखर परब , आकाश जाधव व उपोषणकर्त्यां सरस्वती निकम यांचे पती दत्ता निकम यांनी मध्यस्थी करून नगरपालिकेने दिलेले लेखी आश्वासन उपोषणकर्त्या सरस्वती निकम यांनी स्विकारले व ज्यूस पेऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

यावेळी उपोषणाला पाठींबा दिलेल्या विविध क्षेत्रातील संघटना , राजकिय , पोलीस प्रशासन व पत्रकार मित्रांचे आभार दत्ता निकम व संजय गायकवाड यांनी मानून, सुरेखा खेडकर यांनी नगरपालिकेने दिलेल्या तारखेच्या आत मागण्या मान्य नाही केल्या तर उपोषणकर्त्यां सोबत उपोषण करणार याबाबत इशारा दिला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page