Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीतील हाळ बुद्रुक ग्रामस्थांचे हाळ संपेना - गावातील मुख्य रस्त्याची चाळण..

खोपोलीतील हाळ बुद्रुक ग्रामस्थांचे हाळ संपेना – गावातील मुख्य रस्त्याची चाळण..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे) खोपोली नगरपालिका हद्दीत असंख्य विकास कामे मार्गी लागली असून काही विकास कामे प्रगतीपथावर असल्याचे पाहायला आहे. तर काही प्रभागात लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने काही समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून अशाच काही समस्या हाळ बुद्रुक गावातील रहिवाशांना करावा लागल्याने गावकरी मंडळी लोकप्रतिनिधीच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

हाळ बुद्रुक गावातील काही ठिकाणी अंतर्गत रस्त्याची भयानक चाळण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना जिकरीचे बनले आहे, त्यामुळे हा नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. तर येत्या निवडणूकीत बिनकामाच्या नेत्यांना घरचाच रस्ता दाखवावा लागेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीक व्यक्त आहे.


खोपोलीतील हाळ बुद्रुक ग्रामस्थांचे हाळ संपेना अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ व्यक्त करीत असून गावात असंख्य समस्याने ग्रामस्थ संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीत काही लोकप्रतिनिधीनी आपले कर्तव्य समजून व मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र होऊन असंख्य समस्या मार्गी लावत विकास कामे केल्याने अशा लोकप्रतिनिधीवर सर्वसामान्य नागरिक समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.


तर काही लोकप्रतिनिधी सत्तेचा उपयोग आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत जनतेच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केल्याने याचा नाहक त्रास त्या – त्या प्रभागातील नागरिकांना सहन करावा लागत असून अशाच काही समस्या हाळ बुद्रुक गावातील नागरिकांना सहन कराव्या लागत असल्याने ग्रामस्थ वर्ग त्रस्त झाले असून हाळ बुद्रुक गावातील काही ठिकाणी अंतर्गत रस्त्याची भयानक चाळण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना जिकरीचे बनले आहे.

त्यात बरोबर गटारावरचे स्लँब तुटल्याने भीती वर्तवली जात असल्याने गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेल्या लोकप्रतिनिधीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तर येत्या निवडणूक अशा राजकारणी मंडळींना घरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत येथील मंडळी आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page