Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीत पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एकास अटक करून 2,76,700 चा मुद्देमाल केला...

खोपोलीत पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एकास अटक करून 2,76,700 चा मुद्देमाल केला जप्त…

खोपोली : खोपोली पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान मंदिराजवळ एका चारचाकी गाडीत गांजासह थांबलेल्या इसमाला खोपोली पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या जवळून 76 हजार 700 रुपयाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

हमजा निजामुद्दीन खोपोलीवला ( वय 32, रा. आशियाना बिल्डिंग, खोपोली बाजारपेठ ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गु र नं 80/2022 NDPS कायदा कलम 8 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवार ( दि . 25 ) रोजी खालापूर विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकूर , पोलीस हवालदार राजेश पाटील , खैरनार , दबडे , हंबीर , चालक सहाय्यक फौजदार कोरम इत्यादी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार राजेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे मौजे मुळगाव खोपोली गावच्या हद्दीत अखंड खोपोली हनुमान मंदिर या ठिकाणी हमजा खोपोलीवाला व त्याच्या जवळ असणारी एक वॅगनर कार क्र .MH 01 / BF / 0282 असे 2 लाख रु. किमतीचे वाहन आणि त्यामध्ये असणारा 6.394 किलो ग्रॅम वजनाचा एकूण 76,700 रु. किमतीचा गांजा असा एकूण 2 लाख 76 हजार 700 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page