Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली पालिकेच्या रूग्णालयात कोविशिल्ड  लसीकरणास प्रारंभ..

खोपोली पालिकेच्या रूग्णालयात कोविशिल्ड  लसीकरणास प्रारंभ..

माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, नगराध्यक्ष सुमन औसरमल, नगरसेवक मोहन औसरमल,पत्रकार भाई ओव्हाळ यांनी घेतली लस..

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.


खोपोली नगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात मुख्याधिकारी गणेश शेट यांच्या प्रयत्नाने  कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे.

मंगळवार दि.१६ मार्च रोजी 60 वर्षावरील  नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीकरणास प्रारंभ करण्यात आले असून उद्घाटन प्रसंगी प्रथम पुढाकार घेत मा.माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,नगराध्यक्ष सुमन औसरमल,ज्येष्ठ पत्रकार आणि नगरसेवक,नगरसेविकांना लस घेतली आहे.

ज्येष्ठ नागरिकांंनी उस्फुर्थ प्रतिसाद देत १६२ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.पालिकेच्या रूग्णालयात आयोजित कोविशिल्ड लसीकरण कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सुमन औसरमल,माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, मुख्याधिकारी गणेश शेटे,उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, आरोग्य सभापती आर्चना पाटील ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,गटनेते सुनिल पाटील,मंगेश दळवी,किशोर पानसरे,महिला बालकल्याण सभापती निकीता पवार, नगरसेविका माधवी रिठे,आर्चना मोरे,सुनिता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे,सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, भाजपाचे शहर सेक्रेटरी हेमंत नांदे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता वानखे,इन्चार्ज सिंटर स्मिता तायडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी विनामूल्य लसीकरणास सुरूवात पालिका रूग्णालयात करण्यात आले तरी ज्येष्ठ नागरिकांना मनात कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करण्याचे अवाहन माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी कोविशिल्ड लस घेतल्यावर केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page