Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली पोलिसांची जबरदस्त कामगिरी रात्रीच्या गस्तीदरम्यान अपहरणकर्त्यांना केली अटक...

खोपोली पोलिसांची जबरदस्त कामगिरी रात्रीच्या गस्तीदरम्यान अपहरणकर्त्यांना केली अटक…

 खोपोली(दत्तात्रय शेडगे)
 शिळफाटा येथे रात्रीच्या गस्तीच्यावेळी पोलिसांना संशयास्पद कार आढळली. चौकशी केली असता पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दिगंबर इंदलसिंग चितोडिया तरूणाचे आपहरण केले असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अपहरणकर्त्यां टोळीच्या मुसक्या आवळून अपहरणकर्ता तरूणाची सुटका केली. सदर घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी खोपोली पोलिसांचे कौतुक केले आहे.


खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दि. ३०सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर व पोलीस अंमलदार स्वागत तांबे आणि राम मासाळ हे शिळफाटा येथे गस्त घालत असताना MH-04-CT-2597 क्रमांकाची अल्टो कार आली असता तिच्या मागील नंबर प्लेट वर चिक्खल लावला असल्याने पोलिसांना संशय आला व त्यांनी आतील इसमांची चौकशी केली असता त्या गाडीत सहा इसम होते.

सुरुवातीला ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. पण त्यातील एकाने पोलीस अधिकाऱ्यांना ‘मला वाचवा ‘ अशी विनंती केली असता पोलीस सतर्क झाले आणि त्या सर्वांना खोपोली पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता यातील पाच जण,वामन मारुती शिंदे (३९), योगेंद्र प्रसाद (२५), दिलीप पासवान (३२), धुरपचंद्र यादव (33), संदीप सोनावणे (३५)सर्व राहणार अंबरनाथ, यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दिगंबर इंदलसिंग चितोडिया याचे अपहरण करून त्यास दोन दिवस अपहरण करून अंबरनाथ येथे डांबून ठेवुन त्याच्या घरचांकडे पंचवीस लाख रुपये मागणी केली असल्याचे समजले.

खोपोली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या बाबत पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र. क्र.७३८/२०२१, भा.द.वी.संक.३६४(अ),३८६या प्रमाणे अपहरण व खंडणी मागणे या गुन्ह्याप्रमाणे नोंद केला आहे.सदर पोलिसांनी खोपोली पोलीस ठाण्यात येऊन सदर आरोपीचा ताबा घेऊन अपहरण झालेल्या तरुणाला सुखरूप ताब्यात दिले आणि खोपोली पोलिसांचे खास अभिनंदन केले.

एका अपहरण झालेल्या तरुणाचा जीव वाचवणाऱ्या खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार राम मासाळ,स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी खास अभिनंदन केले असून त्यांना योग्य ते पारितोषिक देण्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन आजच्या झालेल्या पत्रकार परिषदेत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page