Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळागणेशोत्सव काळात अवैध दारू विक्री व जुगारावर लोणावळा ग्रामीण पोलिसांचे बारीक लक्ष...कारवाई...

गणेशोत्सव काळात अवैध दारू विक्री व जुगारावर लोणावळा ग्रामीण पोलिसांचे बारीक लक्ष…कारवाई सुरु..

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्रेते व जुगार अड्डयावर छापा मारून केली कारवाई.
गणेशोत्सव काळात अवैध दारू विक्री व जुगार सुरु असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांना कळताच हद्दीतील.

औंढे, बोरज, चावसर या गावांच्या हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांवर छापा मारून नंदू शिवराम पाठारे ( वय 47, रा. औंढे, ता. मावळ, जि. पुणे ), विलास विष्णू केदारी ( वय 40, रा. बोरज ),संतोष चिंधु शिळावणे ( वय 49, रा. औंढे ), व अंजना बाबू पवार ( वय 40, रा. चावसर, ता. मावळ, जि. पुणे ) या अवैध दारू विक्रेत्यांवर छापा मारत 4 हजार 3 शे 90 रुपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त करून या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


तसेच पाटण गावाच्या हद्दीत अवैध जुगार अड्डयावर छापा मारत संतोष श्रीकांत येवले ( वय 40 ), नवनाथ हरिभाऊ जाधव ( वय 35 ), सुनील झपा तिकोणे ( वय 45 ), राजू रामचंद्र पटेकर ( वय 43 ), अरुण रामचंद्र तिकोणे ( वय 40 ), शंकर चंदू तिकोणे ( वय 30 ), सत्यवान छगन तिकोणे ( 35 ), सागर भाऊ तिकोणे ( वय 35 ), अक्षय गुलाब तिकोणे ( वय 24 ), अक्षय ज्ञानेश्वर दाभाडे ( वय 23 ) व सदाशिव उर्फ गोकुळ किसन हुलावळे ( वय 45, रा. कार्ला ) यांच्याविरुद्ध कारवाई करत रोख रक्कम 26 हजार 500 रुपये व दोन कार असा एकूण 9 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, लोणावळा विभागाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिताराम बोकड, पोलीस नाईक विजय गाले, पोलीस नाईक संतोष शेळके, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक अमित ठोसर, महिला पोलीस नाईक पुष्पा घुगे, पोलीस नाईक नितीन कदम, पोलीस कॉन्स्टेबल रहीस मुलाणी, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिन्द्र पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश पंचरास यांच्या पथकाने सदर कारवाई केली असून.

अवैध धंद्यानबाबत व इतर काही माहिती असल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दूरध्वणी क्रमांक – 02114-273036 यावर संपर्क साधावा असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page