Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगणेश विसर्जन सोहळ्यात 11 जणांना लागला विजेचा शॉक, पनवेल येथील घटना...

गणेश विसर्जन सोहळ्यात 11 जणांना लागला विजेचा शॉक, पनवेल येथील घटना…

पनवेल(प्रतिनिधी) : गणेश विसर्जनावेळी 11 जणांना विजेचा शॉक लागला असल्याची धक्कादायक घटना पनवेल मधील वडघळ गावात घडली आहे . सर्व जखमींवर खाजगी रुग्णायलात उपचार सुरु असून एका बालकाचा समावेश आहे.तर कुंभारवाडा पनवेल येथील एकाच कुटुंबातील 10 जण जखमी झाले आहेत.

सर्वम पनवेलकर , तनिष्का पनवेलकर , दिलीप पनवेलकर , निहार चोणकर , दीपाली पनवेलकर , वेदांत कुंभार , दर्शना शिवशिवकर , प्रसाद पनवेलकर , हर्षद पनवेलकर व मानस कुंभार , रुपाली पनवेलकर अशी शॉक लागलेल्या जखमींची नावे आहेत. जखमींवर विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडघळ खाडी किनारी गणपतीचे विसर्जन सुरु होते . यावेळी विसर्जन घाटाजवळ गणेशभक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आले होते . मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याला विजेचा शॉक लागला . हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला.

या दुर्घटनेत पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील एकाच कुटुंबातील 10 जणांना विजेचा शॉक लागल्याने जखमी झाले . सदर घटनेची माहिती मिळताच माजी सभागृह नेते परेश ठाकूर , पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख , परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने , माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी , महापालिकेचे उपायुक्त , सर्व अधिकारीवर्ग आदींनी रुग्णालयात धाव घेतली असून अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जात आहे . या घटनेचा अधिक तपास पनवेल पोलिसांकडून केला जात आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page