Friday, March 29, 2024
Homeपुणेमावळगहुंजे येथील लोढा बेलमेंडो या उचभ्रू सोसायटीच्या पार्किंग मधील कार मधून 2...

गहुंजे येथील लोढा बेलमेंडो या उचभ्रू सोसायटीच्या पार्किंग मधील कार मधून 2 लाख 10 हजार लंपास…

शिरगांव (प्रतिनिधी) : गहुंजे ता . मावळ येथील एका उचभ्रू सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मर्सिडीज कारमधून 2 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल शनिवारी दि .17 रोजी सकाळच्या सुमारास लोढा बेलमंडो या गहुंजे येथील सोसायटीतून उघडकीस आली.

अज्ञात चोरटयांनी लोढा बेलमेंडो सोसायटी , गहुंजे येथून शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत ही रोकड चोरून नेली . याप्रकरणी प्रवीणकुमार सुरेंद्रकुमार सिंग ( वय 42 , रा . लोढा बेलमडो , गहुंजे ) यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिरगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लोढा बेलमेंडो सोसायटी , गहुंजे ( ता . मावळ ) येथील आपल्या राहत्या घराखालच्या पार्किंमध्ये फिर्यादी प्रवीणकुमार यांनी आपली कार लावली होती . त्यांनी आपल्या मर्सिडीज कार क्र. ( एम.एच.14 जीक्यू 2107 ) मध्ये ठेवलेली 2 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गाडीतून चोरून नेली . कार वॉश करणारा व कार चालक यांच्यावर फिर्यादींचा संशय आहे . पुढील अधिक तपास शिरगाव परंदवडी पोलीस करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page