Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळागानसम्राग्नी लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ लोणावळ्यात मनीषा निश्चल यांना "व्हॉइस ऑफ...

गानसम्राग्नी लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ लोणावळ्यात मनीषा निश्चल यांना “व्हॉइस ऑफ लता” पुरस्कार…

लोणावळा (प्रतिनिधी): भारतरत्न गानसम्राग्नी लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ “रंगीला रे” या तडफदार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन राजेश मेहता आणि सौ उमा मेहता यांच्या वतीने आज दि.4 रोजी महिला मंडळ सभागृह येथे करण्यात आले.मेहता म्युसिकल्स आयोजित संपन्न झालेल्या “रंगीला – रे” या संगीत कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना “व्हॉइस ऑफ लता” या पुरस्काराने गौरविण्यात आले. मनीषा निश्चल यांनी आजपर्यंत संपूर्ण देशात 5000 हुन अधिक संगीत कार्यक्रम केले आहेत.
या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या वर्षस्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.या वेळी “रंगीला – रे”या संगीत कार्यक्रमात मनीषा निश्चल व राजेश मेहता यांनी बहारदार गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उमा मेहता यांनी केले तर ध्वनी व्यवस्था कुमार हारपुडे यांनी सांभाळली. यावेळी कार्यक्रमास विविध मान्यवर व संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने मा. उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, मावळ वार्ता फौंडेशनचे संजय अडसुळे, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, माजी नगरसेवक मनोज लउळकर, संजय गायकवाड, सुरेश गायकवाड, संजय गोळपकर, श्रीराम कुमठेकर, रवींद्र कुलकर्णी, अरविंद भाई मेहता, जयश्री मेहता, जितेंद्र कल्याणजी, संदीप वर्तक, वसुधा पाटील, अनिल गायकवाड, सचिन पारख, प्रदीप वाडेकर, शत्रुघ्न खंडेलवाल, अशोक साळवे, डॉ खंडेलवाल, निश्चल लताड, जयेश गांधी, मृदुला पाटील, नीता शाह, नितीन कल्याण,लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड चे अध्यक्ष अनंता गायकवाड,संयोगीता साबळे, राजू बोराटी, संतोषी तोंडे , रामदास दरेकर, बनवारी गुप्ता, राजेंद्र राणे, माणिक गांधी, रविकांत गांधी, उदय पाटील, किरण स्वामी, अलका औरंगे, सविता परदेशी, विशाखा गोळपकर, कौस्तुभ दामले, परमेश्वरी दामले, मीनाक्षी गायकवाड,उषा बोरास्कर, संध्या गव्हले, सुरेश पिसे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
संगीत रसिकांसाठी तडफदार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन राजेश मेहता व सौ उमा मेहता यांनी केले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page