Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगुंडगे प्रभागात नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी व सभापती वैशाली मोरे यांच्या पुढाकाराने अन्न-धान्य...

गुंडगे प्रभागात नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी व सभापती वैशाली मोरे यांच्या पुढाकाराने अन्न-धान्य वाटप….

एक हात मदतीचा..पूरग्रस्त नागरिकांना आपुलकीचा ..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषदेच्या हद्दीत दि.२१ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढून ते पाणी शेजारीच असणाऱ्या प्रभागात घुसल्याने गुंडगे प्रभागात देखील या महापुराचा फटका अनेक नागरिकांना सहन करावा लागला.

यांत अनेकांचे अतोनात नुकसान झाले,अन्न – धान्याची देखील नासाडी झाल्याने नागरिकांची खाण्या – पिण्याचे देखील बिकट परिस्थिती उद्भवली असताना एक हात मदतीचा ,पूरग्रस्त भागातील नागरिकांना आपुलकीची साथ देत कर्जत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष थेट नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी गुंडगे प्रभागात अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्थानिक नगरसेविका तथा समाज कल्याण समिती सभापती सौ.वैशाली दिपक मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कर्जत नगर परिषदेच्या कार्यतत्पर नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी व गुंडगे प्रभागातील स्थानिक नगरसेविका तथा सभापती समाज कल्याण समिती सौ. वैशाली दिपक मोरे यांच्या पुढाकाराने पंचशील नगर,उद्यम नगर,संत रोहिदास नगर, रेल्वे क्वार्टर ,गुंडगे परिसर येथे दिनांक २९ जुलै २०२१ रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ सुवर्णा जोशी यांचे आवाहनाला मान देवून काही संस्था व स्थानिक दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून कर्जत शहरातील गुंडगे प्रभागात पुरग्रस्त पीडित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.नगराध्यक्षा व स्थानिक नगरसेविका यांनी पूरग्रस्त लोकांचे घरी जाऊन त्यांची विचारपूस केली व अडचणी विचारल्या.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुराचा फटका बसलेल्या सर्वांना मदतीचा हात दिला.यावेळी माजी नगरसेवक दिपक मोरे, कर्जत महिला शहराध्यक्षा आर. पि.आय . वैशाली भोसले, राहील शेख, पंकज पवार, सुनिल परदेशी ,घाऱ्या बाचल ,महेश भोसले, मनीष मोरे, साहिल मोरे, भूषण मोरे, दिपेश धुरी,अमित सोनवणे, मीना कुलकर्णी, सामीया शेख ,गौरव भानुसंघरे , चैतन्य आदी गुंडगे ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page