Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगुन्हेगारांचे कर्दनकाळ कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस जवान !सराईत गुन्हेगारास केले जेरबंद..

गुन्हेगारांचे कर्दनकाळ कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस जवान !सराईत गुन्हेगारास केले जेरबंद..

भिसेगाव-कर्जत( सुभाष सोनावणे)अख्या दुनियेत गुन्हेगाराने गुन्हा करू द्या , मात्र त्याने कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केला तर त्या गुन्हेगारांचे कर्दनकाळ कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात भेटणार , हे आता अनेक गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलीस जवानांनी दाखवून दिले आहे.नुकताच अनेक गुन्ह्यात अनेक वर्षांपासून पोलिसांना तुरी देणारा गुन्हेगार कर्जत रेल्वे पोलिसांनी पकडून जेरबंद केल्याने संभाजी यादव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी पोलीस जवानांचे कौतुक करून ” शाबासकीची थाप ” दिली आहे.

फिर्यादी इसाक सत्तार फकीर, वय ३३ वर्ष, धंदा – नोकरी, रा . बि. नं १३ , पनवेलकर भूमी , खरवई , बदलापुर , पु. ठाणे , हे दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी खोपोली ते बदलापूर रेल्वे स्टेशन असा सी.एस.एम.टी बाजूच्या जनरल डब्यात बसुन प्रवास करीत असताना, संध्याकाळी ०६ – ४४ वा. नेरळ रेल्वे स्टेशन येथे त्यांची रॅकवर ठेवलेली सॅकबॅग पाहिली असता, सॅकबॅग मिळुन आली नाही, गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांची सॅकबॅग चोरून नेल्याने कर्जत रेल्वे पोलीस ठाणे गु.र.नं ८९/२०२१ कलम ३७९ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, नेरळ रेल्वे स्टेशन येथील सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच खास खबरीमार्फत आरोपीचा शोध घेतला असता, सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसुन येणारा इसम खोपोली रेल्वे स्टेशन येथे फिरत असल्याचे समजल्याने, गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार पो . हवा . ज्ञानेश्वर पाटील, पो .शि . समीर पठाण हे खोपोली रेल्वे स्टेशन येथे गेले असता, सदर वर्णनाचा इसम दिसुन आला, पोलिसांना पाहताच पळू लागल्याने, सदर इसमास पोलिसांनी पकडुन ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता, त्याने त्याचे नाव जोसेफ जस्मिन विनसर वालेटीन, वय ६५ वर्ष, धंदा – काही नाही, राह – वुलन चाळ, काबा मस्जिद, फातिमा चर्चच्या बाजुस, एम. एम. शाळेसमोर, ता. अंबरनाथ, ठाणे, असे सांगितले, तसेच गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस करीता, त्याने गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हजर केला, तेव्हा सदर आरोपीस नमुद गुन्ह्यात अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात पुढील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे, १) ०७/२००९ कलम ४५४.४५७.३८०.३४ भा.द.वि नेरळ पोलीस ठाणे २) ४०/२०११ कलम ४५७. ५११. ३८०.३४ भा.द.वि नेरळ पोलीस ठाणे ३) १५/२००७ कलम ४५७. ३८०. १०९. ४११.३४ भा.द.वि बदलापुर पोलीस ठाणे ४) ४३/२००९ कलम ४५४.४५७.३८० भा.द.वि खोपोली पोलीस ठाणे ५) २९/२००७ कलम ४५७.३८०.३४ भा.द.वि बदलापुर पोलीस ठाणे ६) ३७/२००७ कलम ४५७.३८०.३४ भा.द.वि बदलापुर पोलीस ठाणे ७) ०९/२००९ कलम ४५७.३८०.३४ भा.द.वि नेरळ पोलीस ठाणे ८) १८/२०१२ कलम ३७१. १३५. ४२.५११ आर्म अधि, मुंबई पोलीस अधिनियम, अंबरनाथ पोलीस ठाणे ९) ६९३/२०१९ कलम १२४ मुंबई पोलीस अधिनियम १२४ आदी गुन्हे नोंद असल्याने त्याला केलेल्या जेरबंदमुळे अनेक वर्षे पोलिसांना तुरी देणारा सराईत गुन्हेगार कर्जत रेल्वे पोलिसांनी पकडण्यात यश मिळाले आहे . त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे संभाजी यादव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी या पोलीस जवानांचे कौतुक करून ” शाबासकीची थाप ” दिली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page