Friday, March 29, 2024
Homeपुणेमुळशीघरे जळून उध्वस्त झालेल्या आदिवासी कुटुंबांना मुळशी सभापती रवींद्र (बाबा) कंधारे यांची...

घरे जळून उध्वस्त झालेल्या आदिवासी कुटुंबांना मुळशी सभापती रवींद्र (बाबा) कंधारे यांची आर्थिक मदत..

मुळशी (प्रतिनिधी): पेठशहापुर गावातील आदिवासी घरांना लागलेल्या आगीत तीन चार आदिवासी कुटुंब उध्वस्त झाली असून. परपंच पुन्हा उभारणी साठी त्यांना शून्यातून प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा या दुर्घटना ग्रस्त आदिवासी कुटुंबाना सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचे सहकार्य मुळशी तालुक्याचे सभापती रवींद्र (बाबा) कंधारे यांनी केली.
शुक्रवार दि.24/2/23 रोजी पेठशहापूर येथील तीन चार आदिवासी घरांना भर दिवसा अचानक आग लागली त्यात घरातील सर्व वस्तू, कपडे, अन्न धान्य, ओळखपत्र सर्वच जळून खाक झाली.या दुर्घटना ग्रस्त आदिवासी योगिता बंडू पवार,संगीता सखाराम पवार,ईदुबाई भागू हिलम, पांडू सुकरु पवार यांना एक हात मदतीचा या भावनेतून मुळशी तालुकयाचे कार्यसम्राट सभापती रविंद्र (बाबा) कंधारे यांनी स्वतः घटना स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि या आदिवासी बांधवांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
तसेच घटना स्थळाची पाहणी करत तहसीलदार यांच्याशी फोन वरून चर्चा करत या आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून तात्काळ मंजूर करून दिली.तर तलाठी मुरे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करत पंचनामे केले.या दुर्घटना ग्रस्त आदिवासी बांधवांना तात्काळ शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
यावेळी मा.सरपंच गणपत दादा मेंगडे ,मा. उपसरपंच देविदास मेंगडे, उद्योजक आशोक फाटक, तळेगावचे यूवा कार्यकर्ते राजू कराळे, लष्मण मेंगडे,सरपंच हनुमंत पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page