Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडचोरीच्या वाढत्या प्रकरणात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील जवानांची दमदार कामगिरी !

चोरीच्या वाढत्या प्रकरणात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील जवानांची दमदार कामगिरी !

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कोरोना काळातील दोन वर्षे निघून गेल्यावर बाहेर पडलेल्या नागरिकांच्या सामानाची लोकल , मेल गाड्या यांत चोरी होण्याच्या घटनांत वाढ होत असताना कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्तृत्ववान जवानांची चौफेर नजर असल्याने असे गुन्हे करणारे चोर त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.
त्वरित गुन्ह्यांची उकल करून हस्तगत केलेला मुद्देमाल ते त्वरित कायदेशीर मार्गाने फिर्यादीस सुपूर्त करत आहेत.पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत दिनांक ०८ जानेवारी २०२२ रोजी, कर्जत रेल्वे पोलीस ठाणेत गु.र.नं ८९/२०२१ कलम ३७९ भा.द.वि अन्वये, दि .२७ डिसेंबर २०२१ रोजी फिर्यादी इसाक सत्तार फकीर, वय ३३ वर्ष, धंदा – नोकरी, रा . बि. नं १३, पनवेलकर भूमी, खरवई, बदलापुर, ( पु.) , जि . ठाणे, यांनी सॅकबॅग चोरीची तक्रार दाखल केली होती.
नमुद गुन्ह्याचा अल्पावधीत तपास करून चोरीस गेलेली मालमत्ता जप्त करून, गुन्ह्यातील चोरीस गेलेली सॅकबॅग आतील मुद्देमालासह फिर्यादी यांना परत करण्यात आली आहे. पोशि ११३७ पठाण मुद्देमाल अमलदार यांनी वपोनि, संभाजी यादव – कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली फिर्यादी यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करून सदर मुद्देमालाची निर्गती केली आहे.

नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल विनाविलंब परत मिळालेबद्दल, फिर्यादी यांनी सदर कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.तर संभाजी यादव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी आपल्या पोलीस जवानांचे कौतुक केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page