Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडछत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण करण्यात युवा क्रांती पोलिस मित्र संघटनेचा पुढाकार..

छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण करण्यात युवा क्रांती पोलिस मित्र संघटनेचा पुढाकार..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)” शिवरायांचे आठवावे रूप , शिवरायांचा आठवावा प्रताप ” , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावात अफाट ऊर्जा आहे. म्हणूनच त्यांचे नाव घेऊन कार्य करणारे आज मोठ्या प्रमाणात शासकीय , राजकीय , सामाजिक क्षेत्रात मंडळी दिसतात. छत्रपतींचे नाव घेऊन पक्षीय राजकारण करणारे सत्तेवर बसतात पण नंतर ऐन प्रसंगी विसरून जातात.मात्र आजही सामाजिक कार्य करणारे समाजसेवक छत्रपतींचे नाव , त्यांच्या एकेरी नावाच्या पाट्या बदलून आपले कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत.अशीच एक छत्रपतींचे एकेरी नाव असलेले व या परिसरात एक राजकीय पक्ष उदयास आलेल्या त्या पाटीला महत्व असल्याने त्या छत्रपतींच्या एकेरी नावाचा उल्लेख असलेल्या पाटीचा अखेर कर्जतमधील युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रितेश बोंबे यांनी पुढाकार घेऊन ” छत्रपती शिवाजी महाराज चौक ” असे नामकरण केले.
यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील पाटील आळीतील हनुमान मंदिराजवळ असणाऱ्या पाटीवरून युवा क्रांती पोलिस मित्र संघटना आक्रमक झाली होती . त्याचं कारण हि तसच होत . हनुमान मंदीराच्या बाजूला लावलेल्या या पाटीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एकेरी उल्लेख असलेली फार जुनी पाटी आहे.ही पाटी बदला अन्यथा या पाटीवर लिहलेले शिवाजी चौक यातील शिवाजी हे कोणत्या व्यक्तीचे नाव असल्यास त्याचे आडनाव लिहा अशी मागणी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ . पंकज पाटील यांच्याकडे पोलीस मित्र संघटनेने ४ ऑक्टबर २०२१ रोजी केली होती.
जर नगरपरिषदेकडून ही पाटी बदलण्यात आली नाही तर पोलीस मित्र संघटना स्वखर्चाने ही पाटी बदलेल , असा इशारा देखील त्यावेळी देण्यात आला होता.वारंवार पाठपुरावा करूनही नगरपरिषदेकडून ही पाटी ४ महिण्यानंतरही पाटी बदलण्यात आली नसल्याने अखेर युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून या पाटीवरील नाव बदलून ” छत्रपती शिवाजी महाराज चौक ” असं नामकरण छत्रपतींच्या घोषणा देत केले आहे.महाराजांचे नाव योग्य प्रकारे आणि मानानेचं घेतलं जावं यासाठी या युवकांनी स्वखर्चातून हे नाव बदलले असल्याची भावना व्यक्त केली आहे.
खेदाची बाब म्हणजे कर्जत नगर परिषदेवर छत्रपतींचे नाव घेऊन राजकीय प्रवास करून सत्तेवर येणा-या सत्ताधारी पक्षाला व त्यांच्या प्रमुखांना तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधींना त्याचा विसर पडावा , हे दुर्दव्य असल्याचे पोलीस मित्र संघटनेचे म्हणणे आहे.यावेळी ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रितेश बोंबे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश लोहट, कर्जत तालुकाध्यक्ष भूषण कडू , सल्लागार अजय वर्धावे , संपर्क प्रमुख नितीन वाव्हळ , गजानन पाटील , सलीम टिवाळे , कल्पेश डंगर, मयूर पवार, यश लोवंशी, अनिल मोरे, संदेश काळभोर,गणेश मोरे तसेच संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते . त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page