Thursday, April 25, 2024
Homeपुणेमावळजनसेवा विकास समिती संस्थापक किशोर आवारे समाजभूषण पुरस्काराने पुरस्कृत...

जनसेवा विकास समिती संस्थापक किशोर आवारे समाजभूषण पुरस्काराने पुरस्कृत…

मावळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे , आयोजित पुण्यातील साहित्य वर्तुळातील मानाचा मानला जाणारा ‘ समाजभूषण पुरस्कार ‘ जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना माजी कुलगुरू , माजी साहित्य संमेलनाध्यक्ष माननीय डॉ . रामनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे तसेच महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणीचे अध्यक्ष उद्धव कानडे , कार्याध्यक्ष सचिन ईटकर , त्रिदलचे डॉ . सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
किशोर आवारे यांनी केलेल्या कार्याची दखल साहित्याने घेतली असून जनसेवा थाळीच्या माध्यमातून आवारे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले . कोल्हापूर व चिपळूण पुरात केलेली निस्वार्थी मदत , या सर्व कार्याचा गौरव व्हावा यासाठीच किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे डॉ . रामनाथ कोत्तापल्ले यांनी नमूद केले.अनेक साहित्यिकांनी व कवींनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी आपण कुठलाही पुरस्कार स्वीकारत नाही व कुठल्या कार्याची जाहिरातही करत नाही , समाजासाठी सढळ हाताने मदत करण्यातच मला आनंद आहे . मी समाजाचं देणं लागतो आहे. समाजभूषण पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे , मी भविष्यातही निस्वार्थी काम करीन असे किशोर आवारे यांनी पुरस्कार स्वीकारताना नमूद केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page