Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडजुन्या मुंबई पुणे महामार्गावर येत्या दहा दिवसात अपघाताला आळा बसावा..माजी आमदार मनोहर...

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर येत्या दहा दिवसात अपघाताला आळा बसावा..माजी आमदार मनोहर भोईर..

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर येत्या दहा दिवसात अपघाताला आळा बसावा म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न राबविल्यास सेना स्टाईलने आंदोलन छेडणार – माजी आमदार मनोहर भोईर..

प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुका हा मुंबई व पुणे या दोन महानगराच्या मध्यवर्ती असलेला तालुका आहे. या तालुक्यातून मुंबई – पुणे हा मुख्य महामार्ग जात असून त्याचप्रमाणे या तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहतीबरोबर पर्यटन स्थळे असल्याने या तालुक्यातील मुख्य जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वाहनांची मोठी ये जा असते.

त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन वेळोवेळी या मार्गाच्या दुरुस्ती व नुतनीकरणाकरिता विशिष्ट निधी करुन दिल्याने याच्या मार्गाची दुरुस्ती आणि नुतनीकरण करण्यात आले असताना संबंधित ठेकेदाराकडून वेळोवेळी निकृष्ट दर्जाचे काम करण्यात या मार्गाची अनेकदा दुरुस्ती झाल्याने या मार्गावर दुरुस्तीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढल्याने अनेक वाहन चालकांसह प्रवासी वर्गाचा नाहक बळी गेल्याचे पाहायला मिळाले.

असून या बहुतांशी अपघाताला संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणाच जबाबदार ठरल्याचे पाहावयास मिळाल्याने ठेकेदार व संबंधित प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत असताना या अपघाताला आळा बसावा म्हणून माजी आमदार मनोहर भोईर, जि.प.सदस्य मोतिराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित ठेकेदार व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तहसिलदार, पोलिस ठाण्यात निवेदन देत कारवाईची मागणी केली असता.

उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्या प्रयत्नांतून 27 अॉगस्ट रोजी खालापूर पोलिस ठाण्यात एमएसआरडीसी ठेकेदार, अधिकारी, आयआरबीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पाडल्याने यावेळी उपस्थित प्रवासी, वाहन चालक, राजकीय नेते, सामाजिक नेत्यांनी आपला संताप व्यक्त करीत या मार्गाची गणपती आधी दुरुस्ती करून अपघात ठिकाणी फलक लावावेत जेणेकरून अपघाताचे प्रमाण घटेल अशी सुचना देण्यात देत महामार्गाची पाहणी करण्यात आली.


मुंबई – पुणे महामार्गावरील दांडाफाटा ते खोपोली दरम्यान दररोज असंख्य लहान मोठे अपघात घडत असल्याने या अपघातात अनेकांचा नाहक बळी जाऊन अनेकांना शारीरिक दुखापतीला सामोरे जावे लागत असून बहुतांशी अपघात हे मार्गावर नुतनीकरण व दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचा आरोप वाहन चालक व प्रवासी वर्ग करित आहेत.

तर मुंबई – पुणे महामार्ग क्रमांक NH 4 वर होत असलेल्या अपघाताला आळा बसावा म्हणून माजी आमदार मनोहर भोईर, जि.प.सदस्य मोतिराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी यांनी आक्रमक पवित्रा घेत वेळोवेळी संबंधित विभागाला व प्रशासनाला निवेदन देण्यात आले असता उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्या प्रयत्नांतून 27 अॉगस्ट रोजी खालापूर पोलिस ठाण्यात एमएसआरडीसी ठेकेदार, अधिकारी, आयआरबीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पाडली असून यावेळी ठेकेदाराच्या कामाबद्दल सर्वाना संताप व्यक्त केला असून त्वरित महामार्गाची पाहणी करण्यात आली.


यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, मोतिराम ठोबरे, श्यामभाई साळवी, एकनाथ पिंगळे, भाऊ सणस आदीप्रमुखांनी आपले मत व्यक्त करीत आक्रमक पवित्रा घेत संबंधित ठेकेदारला जाब विचारला.याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, उपपोलिस निरिक्षक बजरंग राजपूत, माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जि.प.सदस्य मोतीराम ठोंबरे, पं.स.सदस्य माजी उपसभापती श्यामभाई साळवी, शिवसेना समन्वयक एकनाथ पिंगळे, सामाजिक नेते मनिष खवले, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, शिवसेना प्रसिध्दीप्रमुख भाऊ सणस, अनंता पाटील, चिंतामण चव्हाण, सरपंच बोरगाव प्रितेश मोरे आदीसह एमएसआरडीसी उपअभियंती प्रेरणा कोटक, शंकरवार, वैभव पावसकर, कैलास पाटील, आयआरबीचे एम.एच.गांधी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page