![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरात सध्या पाण्याची खूपच ” बोंबाबोंब ” सुरू आहे . अनेक प्रभागात अजूनही पोटभर पाणी मिळत नाही , तर पहिल्या मजल्यावर देखील पाणी चढत नसल्याने बेकायदेशीरपणे पाण्याची मोटार लावली जाते , हे पालिका प्रशासनाला माहित असूनही यावर , कुणी पावले उचलून कारवाई करताना दिसत नाहीत , ज्यांना मुबलक पाणी मिळते ते ” खुश ” , तर ज्यांना हंडाभर पाणी मिळत नाही ते , ” आक्रोश ” करताना दिसत असतात . त्यातच वर्षाकाठी येणारी पाणी पट्टी मात्र सर्वांना रितसर भरावी लागत असल्याने , निटवर पाणी न देणाऱ्या आणि भरमसाठ पाणी पट्टी भरावी लागत असल्याने सर्वांचाच संताप अनावर होत असताना दिसत आहे . त्यातच वर्षाकाठी पाऊस आला….पाणी नाही , वीज गेली …पाणी नाही , तांत्रिक घटना घडली……पाणी नाही , मोटार खराब झाली….. पाणी नाही , पाईप लाईन लिकिजं झाली……पाणी नाही……अश्या वेगवेगळ्या कारणाने वर्षभरात मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी ओसंडून वहात असल्याने , नागरिकांनी आता ” जो पक्ष पाणी पट्टी माफ करेल , जो पक्ष २४ तास पाणी देईल , जो पक्ष नेहमी कारणे न देता पाणी पुरविल ” अश्या पक्षालाच व त्याच्या उमेदवारांनाच मते देवून निवडून देऊ , व त्यांनाच सत्तेवर बसवू , अशी सनसनाटी चर्चा सध्या कर्जतमध्ये होताना दिसत आहे.
पूर्वीची पाणी पट्टी आठशे रुपये असताना ती पंधराशे रुपये करण्यात आली , मात्र त्या हिशोबाने पाणी मिळणे व ते देणे पालिकेचे कर्तव्य होते , ते मिळत नाही , ते देत नाही , याचा जाब देखील नागरिकांच्या सेवेसाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी यांचे असल्याने यांत लोकप्रतिनिधी देखील ” कर्तव्यात कसूर ” करताना दिसून येत आहेत , तर त्यांना ज्या भरोष्यावर मते देवून निवडून दिले जाते , यात हे उमेदवार निवडून गेल्यावर नागरिकांशी ” दगाबाज ” करत असल्याने अश्या लोकप्रतिनिधी विरोधात संतापाचे वातावरण असूनही आता काहीच करू शकत नसल्याने नागरिकांचा देखील नाईलाज होवून जातो.
गेली अनेक वर्षे पाण्याविना त्रास सहन केल्यावर येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत जो पक्ष २४ तास पाणी व पाणी पट्टी माफ करेल , अश्याच पक्षाच्या उमेदवारांना आम्ही मते देवून , निवडून देवू , असे आता मतदारांनी ठरविले असल्याचे , प्रत्येक प्रभागातून नागरिकांच्या चर्चेतून समजण्यात येते . त्यामुळे आताची येणारी निवडणूक हावश्या – गवश्या – नवश्या उमेदवारास व त्याच्या पक्षाला सोपी राहिली नसून , पाणी सारख्या मूलभूत अधिकारात वंचित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना चांगलाच धडा शिकवणार , अशी ठाम भूमिका मतदार घेणार असल्याचे समजते.