Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडट्रकच्या धडकेने कार सुरक्षा कठड्यावरून पडली खड्डयात; नशिब बलवत्तर म्हणून तीन जण...

ट्रकच्या धडकेने कार सुरक्षा कठड्यावरून पडली खड्डयात; नशिब बलवत्तर म्हणून तीन जण बचावले..


खलापूर-दत्तात्रय शेडगे.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिटजवळ ट्रकची जोरदार धडक बसल्याने कार रस्त्याच्या सुरक्षा कठड्यावरून खाली खड्डयात पडली. सुदैवाने ती दगडांमध्ये आडकली अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता.
आज दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कारमधील तीन जण सुदैवाने बचावले आहेत.पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून खोपोली एक्झिट येथे बाहेर पडली व बायपास रस्त्याने खोपोली गावाकडे जात असताना द्रुतगती मार्गाच्या पुलाजवळ एका ट्रकने दोन वाहनांना धडक दिली.
यामध्ये कार ही रस्त्याच्या सुरक्षा कठड्यावरून खाली खड्डयात पडली व दगडात आडकली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी आतमधील तीनही जण सुरक्षित आहेत,केवळ नशिब बलवत्तर असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्या ठिकाणी ही कार पडली व आडकली तेथेच बाजुला द्रुतगती मार्गाच्या उड्डाण पुल उभारणीकरिता मोठा खड्डा खणण्यात आला होता व त्यांचे फुटिंगचे काम चालू असल्याने सळया वर आल्या होत्या.
त्यामध्ये कार पडली असती तर फार मोठी जिवितहानी झाली असती. घटनेची माहिती समजताच खोपोली व बोरघाट पोलीसांसह अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. क्रेनच्या सहाय्याने खड्डयात पडलेली कार बाहेर काढली. या अपघाताचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page