Saturday, April 20, 2024
Homeपुणेलोणावळाडेक्कन क्वीन एक्सप्रेस मधील लोणावळा पास धारकांची भोगी बंद.. प्रवाशांना करावा लागतोय...

डेक्कन क्वीन एक्सप्रेस मधील लोणावळा पास धारकांची भोगी बंद.. प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना !

लोणावळा : मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मध्ये लोणावळा पास धारकांसाठीची भोगी पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी लोणावळा मुंबई रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे विभागाकडे केली आहे.

मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मध्ये वर्षानुवर्षे सुरु असलेली लोणावळा पास धारकांसाठीची भोगी बंद करण्यात आल्याने रोजच्या रोज सकाळी पुण्याहून सुटून मुंबई कडे जाणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस मध्ये लोणावळ्यात या गाडीत बसणाऱ्या प्रवाशांसाठी डी -10 ही एक भोगी पास धारकांसाठी आरक्षित ठेवलेली असायची . पिंपरी , चिंचवड ते लोणावळा दरम्यान राहणारे आणि रोज मुंबई प्रवास करणारे सुमारे 100 ते 150 प्रवासी या सुविधेचा लाभ घ्यायचे . मात्र 22 मार्च पासून रेल्वे विभागाने ही सुविधा बंद केल्याने रोज या गाडीने प्रवास करणाऱ्या पास धारक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असून या सर्वच प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत .

त्यामुळे रेल्वे विभागाने तात्काळ सदर पास धारक भोगी पुन्हा सुरू करावी अशी मागणी लोणावळा मुंबई रेल्वे प्रवासी संघा कडून रेल्वे विभागाकडे करण्यात येत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page