Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळाडॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त लोणावळ्यात स्वच्छता अभियान !

डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त लोणावळ्यात स्वच्छता अभियान !

लोणावळा : डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण”डॉ.ति.श्री नानासाहेब धर्माधिकारी”यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त लोणावळा शहरात 10 ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सदर स्वच्छता अभियानात लोणावळा शहरातील 190 सदस्यांनी सहभाग नोंदवून लोणावळा नगरपालिका परिसरातील लोणावळा शहर पोलिस स्टेशन परिसर,शंखेश्वर हास्पीटल, लोणावळा रेल्वे परिसर, लोणावळा बसस्थानक परिसर, खंडाळा आरोग्य केंद्र परिसर, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर, तुंगार्ली शाळा परिसर, कन्या शाळा, लोणावळा टेलिफोन एक्सचेंज इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


लोणावळा हद्दीतील दहा ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवून 400 किलो ओला कचरा व 2800 किलो सुका कचरा मिळून तब्बल 3200 किलो कचरा संकलन करून वरसोली कचरा डेपो येथे नेण्यात आला यासाठी लोणावळा नगरपालिका प्रशासनाने विशेष सहकार्य करून या अभियानात सहभागी झाले.

- Advertisment -

You cannot copy content of this page