Friday, April 19, 2024
Homeपुणेलोणावळातथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सिद्धार्थ नगर येथे विविध कार्यक्रमांचे...

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सिद्धार्थ नगर येथे विविध कार्यक्रमांचे दोन दिवस आयोजन…

लोणावळा दि.16 : बुद्ध पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2022 बौध्दजन सेवा संघ व रमामाता महिला मंडळ सिध्दार्थनगर , लोणावळा यांच्या विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सालाबादप्रमाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवार दि. 16 रोजी सकाळी 8:30 ते धम्मपदण 9:30 वा. धम्मपठण,सामुदायिक वंदना बुध्दपुजा व भिमस्तुती कार्यक्रम असून, प्राध्यपक मा.सोमनाथ गोडसे यांचे धम्म प्रवचन तसेच धम्मध्वजारोहन करून लोणावळा शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व इतर स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्यात करून सायंकाळी जेतवन बुद्ध विहार येथून सायंदीप यात्रा प्रारंभ ते नेताजी सुभाषचंद्र बोस दरम्यान विसर्जन असे आयोजन केले असून दि.17 रोजी सिध्दार्थनगर येथे दुपारी 3.00 ते सायंकाळी 6:00 यावेळेत महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा तर रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम मायबोली मराठी ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळी बुद्ध पूजेवेळी बौध्दजन सेवा संघाचे अध्यक्ष विजय भिमराव जाधव,उपाध्यक्ष संजय अडसुळे, रमामाता महिला मंडळाच्या महिला अध्यक्षा उषाताई धर्मरक्षित जाधव, मंगलताई दिलीप शिंदे, मनिषाताई जयराम कदम, भारतीताई प्रभोत जाधव, रंजनाताई, शेवंताताई मधुकर शिंदे यांसमवेत कार्यकर्ते व सिद्धार्थ नगर येथील सर्व रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page