Thursday, April 25, 2024
Homeक्राईमतळेगाव येथे 38 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या...

तळेगाव येथे 38 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या…

तळेगाव दाभाडे ( प्रतिनिधी ): तळेगाव दाभाडे शहरातील इंद्रपुरी कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर एका माहिलेच्या मानेवर व खांदयावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली मंगळवार दि.9 रोजी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली आहे . संगिता बाळासाहेब भोसले ( वय 38 , रा . मंत्रा सिटी तळेगाव दाभाडे ) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे .

मिळालेल्या माहितीनुसार , मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या पूर्वी तळेगाव दाभाडे येथील इंद्रपूरी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संगीता बाळासाहेब भोसले यांचा अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून मानेवर व खांद्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे .

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत .

- Advertisment -

You cannot copy content of this page