Friday, March 29, 2024
Homeपुणेतळेगावतळेगाव शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फलकांवर अतिक्रमण कारवाई...

तळेगाव शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फलकांवर अतिक्रमण कारवाई…

तळेगाव दाभाडे – तळेगाव शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फुटपाथ व रस्त्यावर दुकानांचे फलक लावून अतिक्रमण केलेल्या दुकानांचे फलक व रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई करून हे अतिक्रमण काढण्यात आले.

तळेगाव वाहतूक विभाग आणि तळेगाव नगरपरिषद यांच्यावतीने शिवाजी महाराज चौक ते रेल्वे स्टेशन , सिंडीकेट बँक चौक या दरम्यान फुटपाथवर व सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे व्यवसायिक दुकानदारांचे जाहिरातीचे फलक तसेच भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली .

तळेगाव वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल , पोलीस उपनिरीक्षक पोटे व स्टाफ यांनी तळेगाव नगरपालिका अतिक्रमण विभाग यांच्या सोबत संयुक्त कारवाई केली व अतिक्रमण काढण्यात आले आहे .
तसेच सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यावर कोणीही त्यांचे वाहन अस्तव्यस्त पार्किंग करणार नाही याबाबत नोटीस दिली व योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत . यापुढे तळेगाव विभागात सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी बेशिस्त वाहने , जाहिरातीचे फलक , भाजी व फळ विक्रेते यांच्यावर तळेगाव वाहतूक विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळे यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

You cannot copy content of this page